सांगोला तालुका मर्यादित भव्य डे – नाईट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ

सांगोला (तालुका प्रतिनिधी): छ.शिवाजीनगर गणेश उत्सव मंडळ, छ. शिवाजीनगर सांगोला, चेतनसिंह (बाळासाहेब) केदार-सावंत मित्रपरिवार सांगोला तालुका व आर. सी. सी. क्रिकेट क्लब छ. शिवाजीनगर सांगोला यांच्या संयुक्त विद्यमाने सांगोला तालुका मर्यादित भव्य डे – नाईट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला. आमदार शहाजीबापू पाटील, भाजपाचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत, उद्योगपती बाळासाहेब आसबे, संजय केदार, आनंदा माने, नाथा जाधव, शिवाजीराव गायकवाड, नवनाथ पवार, वसंत सुपेकर, सोमनाथ मरगर यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. सदरच्या स्पर्धा न्यू इंग्लिश स्कुल क्रिडांगणावर पार पडणार आहेत.
सांगोला तालुका मर्यादित भव्य डे – नाईट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकासाठी २ लाख ५० हजार रुपयांचे बक्षीस व चषक चेतनसिंह केदार-सावंत मित्रपरिवाराच्या वतीने, द्वितीय बक्षीस १ लाख ५० हजार रुपयांचे बक्षीस व चषक पुण्यवंत खटकाळे आणि संजय केदार यांच्या वतीने, तृतीय बक्षीस ७५ हजार रुपये व चषक नाथबाबा मंगल भांडार व केटरर्स आणि नाथबाबा डेकोरेटर्स यांच्या वतीने, चतुर्थ बक्षीस ५० हजार रुपये व चषक आनंदा माने व यश जाधव यांच्या वतीने देण्यात येणार आहे.
सदरच्या स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी किरण चव्हाण, राजू शिंदे, पिंटू शिंदे, इनुस नदाफ, विनोद काटकर, अक्षय जाधव, चिवळ्या कोळी, श्याम माळी, अविनाश गायकवाड, सोमा भडंगे, नागेश लोखंडे, जावेद सय्यद, आनंद लोखंडे, माचो सोनवणे, विनायक सोनवणे, चिमण सोनवणे, सुरेश जगधने, सागर कोळी, सौरभ देशपांडे, सनी दिवटे परिश्रम घेत आहेत.