सांगोला- ढालगाव बस तब्बल अडीच तास उशिराने धावली.
त्रासलेल्या प्रवाशांनी डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्याशी साधला संपर्क, त्यानंतर केवळ दहाच मिनिटात बस झाली मार्गस्थ

सांगोला( प्रतिनिधी) सांगोला एसटी आगारातून दररोज संध्याकाळी 5.30 वाजता सोडण्यात येणारी सांगोला- ढालगाव ही एसटी बस शुक्रवार दिनांक 8 डिसेंबर रोजी तब्बल अडीच तास उशिराने म्हणजे रात्री 8 वाजता मार्गस्थ झाली.
बसच्या अडचणीमुळे त्रासलेल्या प्रवाशांनी पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्याशी संपर्क साधला व आपले गाऱ्हाणे मांडले .डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी याची तातडीने व गांभीर्याने दखल घेत सांगोला आगाराशी संपर्क साधला .त्यानंतर केवळ दहाच मिनिटात बस मार्गस्थ झाली . घरी परतण्यासाठी उशीर होत असल्याने वाहतूक नियंत्रक यांच्याशी विद्यार्थ्यांनी व प्रवाशांनी वारंवार संपर्क साधला असता केवळ दहा मिनिटात बस लागेल असे साडेपाच वाजल्यापासून रात्री आठ वाजेपर्यंत सांगत राहिले.
शेवटी विद्यार्थ्यांना व प्रवासी वर्गाला नाईलाजाने पुढचे पाऊल उचलावे लागले .भविष्यात असे होऊ नये अशी प्रवासी वर्गाची मागणी आहे. सांगोला – ढालगाव ही एसटी बस कमलापूर ,वाटंबरे, नाझरा, नाझरामठ, नाझरा, चोपडी, बुद्धेहाळ, गौडवाडी, कोळा, पाचेगाव, किडे बिसरी, नागज , ढालगाव या मार्गावरून धावते.सांगोला आगारातून अनेक एसटी बसेस ह्या अवेळी धावत असतात याकडे वरिष्ठांचे लक्ष नसून सगळाच खेळ खंडोबा चालला की काय अशी शंका उत्पन्न होते.हे उशिरा धावणाऱ्या, बसेसमुळे लक्षात येते
. एसटी बसेस उशिरा सोडल्या जात असल्यामुळे प्रवासी वर्गाचे मोठे हाल होते.रात्री उशिराच्या मुक्कामी एसटी बसेस वेळेवर सोडाव्यात अशी प्रवासी वर्गाची मागणी आहे. रात्री 8 वाजता का होईना सांगोला – ढालगाव ही बस , सोडल्यामुळे प्रवासी वर्गाने डॉ.बाबासाहेब देशमुख यांचे आभार व्यक्त केले.