माणगंगा नदीच्या कामांचा होणार राजधानी दिल्लीत गौरव
सांगोला दि. ९ – माणगंगा भ्रमणसेवा संस्थेच्या वतीने गेल्या १० ते १२ वर्षांपासून सुरू असलेल्या माणगंगा नदी पुनरुज्जीवन कार्याची दखल भारत सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाने घेतली असून या संस्थेच्या वतीने गेल्या १० वर्षात सोलापूर व सांगली जिल्ह्यातील ७५ कि.मि. नदी स्वच्छता व त्यांवरील १८ को.प.बंधार्याची स्वच्छता करून गाळमुक्त केले. त्यामुळे पाणी साठ्यात वाढ झाली आहे.
या कामाची दखल भारत सरकारच्या पातळीवर घेण्यात आली असून त्यानिमित्त संस्थेचे अध्यक्ष वैजिनाथ घोंगडे यांचा बुधवार. दि.१३ डिसेंबर रोजी दु. २.०० वा. नवी दिल्ली येथे केंद्रीय जलशक्ती मंत्रालय, जल संसाधन नदी विकास मंत्रालय यांच्या वतीने सन्मान करण्यात येणार आहे. या सोहळ्यानिमित्त सातारा जिल्हा माणगंगा नदी पुनरुज्जीवन कार्याचे प्रेरणास्थान आय. ए. एस. अधिकारी, इन्कम टॅक्स आयुक्त मा. डॉ. नितीन वाघमोडे तसेच संस्थेचे सचिव डॉ. राजेंद्र सूर्यवंशी उपस्थित रहाणार आहेत.