सांगोला तालुकामहाराष्ट्रशैक्षणिक

बदलत्या काळानुसार विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात विशेष सुवर्णसंधी -प्रा.प्रबुद्धचंद्र झपके

सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सांगोला, आयोजित विद्यामंदिर परिवारातील राष्ट्रीय, राज्य, विभाग स्तरावर दैदिप्यमान कामगिरी केल्याबद्दल सत्कार समारंभ

 क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र पुणे येथे  आयोजित शालेय क्रीडा स्पर्धा 2023 /24 यामध्ये विद्यामंदिर परिवारातील विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक कामगिरी करत दैदिप्यमान यश मिळवल्याबद्दल विशेष सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
कु प्रतिक्षा येलपले हिने गोळा फेक स्पर्धेमध्ये राज्यस्तरावर प्रथम क्रमांक मिळवला. मेहक मुलाणी हिने बॉक्सिंग स्पर्धेमध्ये विशेष कामगिरी केली. दिपाली दोलतोडे भालाफेक मध्ये विशेष कामगिरी केली. साहिल कुदळे कुस्ती 55 किलो वजनी गटामध्ये विभाग स्तरावर कामगिरी केली. विशाल वाघमोडे 3000 मीटर धावणे यामध्ये विशेष कामगिरी केली. तसेच नुकत्याच झालेल्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये कुशल खाडे प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल वरील सर्वांचा प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांच्या हस्ते संस्थेच्या वतीने प्रोत्साहनपर रक्कम देऊन सत्कारमूर्ती गुणी विद्यार्थी व पालकांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
यावेळी प्रमुख उपस्थिती, सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रबुद्धचंद्र झपके, संस्था सचिव मं.श. घोंगडे,संस्था सदस्य डी.डी जगताप, प्राचार्य गंगाधर घोंगडे,प्राचार्य श्रीकांत लांडगे, प्राचार्य अमोल गायकवाड,इत्यादींची उपस्थिती होती.
यावेळी सर्व क्रीडा शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. त्यामध्ये क्रीडा नियंत्रक पोपट केदार सर,जुनिअर कॉलेज नियंत्रक डी. के पाटील, प्रशाला क्रीडा नियंत्रक नरेंद्र होनराव सर, प्रा.सचिन चव्हाण ,सुभाष निंबाळकर सर, संतोष लवटे सर, कोळा विद्यामंदिरचे क्रीडा नियंत्रक महादेव नरळे सर, प्रा.सुनील माळी,तसेच विज्ञान प्रदर्शनामध्ये विशेष कामगिरी केल्याबद्दल प्रा.पिंटू गुसाळे,यतिराज सुरवसे सर, सचिन बुंजकर सर इ.मार्गदर्शक शिक्षकांचा श्री.झपके सर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
 यावेळी प्रा.प्रबुद्धचंद्र झपके सर बोलत असताना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच क्रीडा क्षेत्राकडे विशेष लक्ष दिले पाहिजे व परिश्रम घेतले पाहिजे. सध्याचे युग हे स्पर्धेचे युग आहे. स्पर्धेच्या युगामध्ये विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रामध्ये विविध प्रकारच्या संधीचे सोने केले पाहिजे. तसेच आपल्या आदर्शकडे डोळसपणाने पाहिले पाहिजे. ध्येय नेहमी सकारात्मक असावे. ते सहज साध्य होते.
पुढे बोलताना ग्रामीण भागातील विद्यार्थ्याकडे गुणवत्ता असते.परंतु योग्य मार्गदर्शन मिळाल्यास  ते विद्यार्थी विविध क्षेत्रांमध्ये नेत्रदीपक व चमकदार अशी कामगिरी करून यश मिळवतात. नेहमी आपल्या आई-वडिलांना आदर्श मानले पाहिजे. असे त्यांनी सांगितले. यावेळी प्राचार्य गंगाधर घोंगडे यांनी विद्यार्थी हित नेहमी डोळ्यासमोर ठेवून काम करावे. व क्रीडा क्षेत्रात आपले व आपल्या शाळेचे नाव उज्वल करावे. तसेच यलमार मंगेवाडी गावचे माजी सरपंच दत्तात्रय मासाळ यांनी विद्यामंदिर शाळेमध्ये विद्यार्थी व खेळाडूंची अतिशय चांगली काळजी घेतली जाते. हीच प्रेरणा विद्यार्थ्यांना यशापर्यंत पोहोचवते असे त्यांनी सांगितले.
यावेळी उपस्थित  उपप्राचार्य सौ.शहिदा सय्यद, पर्यवेक्षक बिभीषण माने,अजय बारबोले,पोपट केदार तसेच पालक वर्ग दत्तात्रय येलपले, श्री. बसवंत दोलतोडे, तसेच अन्य पालक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक सुनील भोरे सर, तर सूत्रसंचालन प्रशाला क्रीडा प्रमुख नरेंद्र होनराव सर , तर आभार प्रदर्शन ज्युनिअर कॉलेज क्रीडा प्रमुख प्रा.डी.के.पाटील यांनी मानले. सदरचा कार्यक्रम पार पडण्यासाठी क्रीडा विभागाने विशेष परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!