विद्यार्थ्यांच्या कला गुणांना प्राधान्य देणारे “कॉमर्स कार्निवल “ उत्साहात संपन्न

सांगोला महाविद्यालय सांगोला येथे दि. २८ व २९ मार्च, २०२५ रोजी वाणिज्य विभागाच्या वतीने विभागातील विद्यार्थ्यांसाठी कॉमर्स कार्निवल चे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळावा म्हणून प्रश्नमंजूषा स्पर्धा, पोस्टर प्रेजंटेशन, मॉडल मेकिंग स्पर्धा घेण्यात आल्या, दि. २८ मार्च रोजी प्रश्नमंजुषा स्पर्धेचे उद्घाटन मा. प्र. प्रा. डॉ सुरेश भोसले यांनी केले. या स्पर्धेमध्ये सुमारे १५० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. या स्पर्धेला शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेज सांगोला चे प्राचार्य डॉ. रणजीत देशमुख यांनी भेट दिली, तसेच या स्पर्धेचे परीक्षण प्रा. डॉ. अर्जुन मासाळ, प्रा. डॉ. मच्छिंद्र वेदपाठक, प्रा. ओंकार घाडगे यांनी केले. दि २९ मार्च रोजी पोस्टर प्रेझेंटेशन आणि मॉडेल मेकिंग स्पर्धेचे उद्घाटन गायत्री मॉल सांगोला चे भागीदार मा विनायकजी वाघमारे, प्र. प्राचार्य डॉ सुरेश भोसले यांनी केले.या स्पर्धेचे परीक्षण कॅप्टन.संतोष कांबळे, डॉ.जमीर तांबोळी यांनी केले.
मा. विनायकजी वाघमारे यांनी विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळालाच पाहिजे व त्याच बरोबर विद्यार्थ्यांना उद्योजक बनण्याचे स्वप्न असेल तर चिकाटी किती महत्वाची आहे हे सांगितले,अध्यक्षीय मनोगतात प्र. प्राचार्य डॉ सुरेश भोसले यांनी विद्यार्थ्यांना फक्त पुस्तकी ज्ञान असून चालत नाही, तर त्यांच्या कला गुणांना सुद्धा वाव मिळाला पाहिजे, त्या दृष्टीने वाणिज्य विभाग नेहमी कार्यरत असतो असे मत व्यक्त करुन वाणिज्य विभागाचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.श्रावणी पवार यांनी केले तर उपस्थितांचे आभार कु.निकिता कोळी यांनी मानले. तर उपस्थितांपैकी कु.गौरी जाधव, ज्योती खंदारे, रोशनी ठोकळे या विद्यार्थ्यांनिंनी मनोगते व्यक्त केली.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्र. प्राचार्य डॉ सुरेश भोसले कार्यालयीन अधीक्षक प्रकाश शिंदे, विभाग प्रमुख डॉ. विद्या जाधव, प्रा.समाधान माने, प्रा.सचिन सुरवसे, प्रा.प्राप्ती लामगुंडे, सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका, कर्मचारी यांचे सहकार्य केले.



