जि. प. प्राथ. शाळा मुजावर पिरजादेवस्ती शाळेमध्ये शिक्षण सप्ताहाची उत्साहात सुरुवात

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त 21 जुलै ते 28 जुलै दरम्यान शिक्षण सप्ताहाचे आयोजन महाराष्ट्र शासनाच्या वतीने करण्यात आले आहेत.जि. प. प्राथ शाळा मुजावर पिरजादेवस्ती शाळेत मोठ्या उत्साहात शिक्षण सप्ताहाची सुरुवात करण्यात आली.दुसरा दिवस पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान (FLN)या उपक्रमांतर्गत निपुण प्रतिज्ञा घेण्यात आली.
प्रतिज्ञेसाठी केंद्र प्रमुखा जाधव मॅडम उपस्थित होत्या.गणित तज्ञानच्या गोष्टी, गणिती व भाषिक खेळ, जादुई पिटारातील साहित्य वापरून विविध कृती करून घेण्यात आल्या,मुळाक्षरे व अंकांची गाणी घेण्यात आली,अशा प्रकारे विविध उपक्रम घेण्यात आले. भौमितिक आकरांच्या रांगोळ्या, चित्रे काढण्यात आल्या, समुदायीक वाचन घेण्यात आले.त्यासाठी केंद्रप्रमुख सौ. जाधव मॅडम यांचे मार्गदर्शन मिळाले. तसेच मुख्याध्यापिका श्रीमती.जिरगेमॅडम व उपशिक्षिका सौ. पिरजादेमॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.