सांगोला तालुका

स्व.गणपतराव देशमुख हेच माझे राजकीय गुरू – नाना(भाऊ) पटोले

 सांगोला येथे  सकल लोणारी समाज बांधवांच्या वतीने कसबा पेठ पुणे येथील विधानसभा पोटनिवडणुकीत प्रचंड मताधिक्याने निवडून आलेली लोणारी समाजाची पहिले आमदार श्री.रवींद्र (भाऊ)धंगेकर सांगोला शहरात भव्य सत्कार समारंभाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमासाठी  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष तथा देशाचे माजी कृषी मंत्री खासदार शरद चंद्रजी पवार साहेब, प्रमुख पाहुणे काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार नानाभाऊ पटोले, ही दोन प्रमुख मान्यवर उपस्थित होती.
खा.शरदचंद्रजी पवार साहेब यांनी स्वर्गीय आबासाहेबांच्या आठवणीचा उजाळा देत सांगोला तालुक्याच्या विकासात स्वर्गीय गणपतरावांचे फार मोठे योगदान आहे.हे कधीही विसरून चालणार नाही. यावेळी महाराष्ट्र राज्य पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ.बाबासाहेब देशमुख यांना आपुलकीने जवळ घेत काळजीने विचारपूस केली व हातात हात दिला.तसेच महाराष्ट्र राज्याचे धडाकेबाज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी होणारी समाज बांधवांच्या मेळाव्यास मार्गदर्शन करताना सांगोला तालुका खरोखरच भाग्यवान आहे.सांगोला तालुक्याची कर्मभूमी ही सबंध महाराष्ट्रामध्ये स्वर्गीय गणपतराव देशमुख यांच्या नावाने ओळखली जाते.सांगोला म्हटलं की गणपतराव असं समीकरण उभ्या महाराष्ट्राला माहीत होतं आणि आहे. असं नेतृत्व तुम्ही दीर्घकालापर्यंत टिकवलं.पटोले पुढे बोलताना जवळजवळ पंचवीस वर्षांपूर्वी आम्ही विधानसभेमध्ये निवडून गेलो त्यावेळी आमचे मार्गदर्शक तथा गुरु म्हणून स्वर्गीय गणपतराव देशमुख यांनी माझ्या सहित महाराष्ट्रातील अनेक नवनिर्वाचित आमदारांना सभागृहामध्ये कसे बोलावे,सभागृहामध्ये कसे वागावे, सभागृह लोकशाहीचे जिवंत आत्मा आहे.सभागृहात प्रश्न कसे विचारावेत सर्वसामान्य शेतकरी, व्यापारी, दिन – दलित,वंचित, शोषित,पीडित,कष्टकऱ्यांचे प्रश्न नेहमी स्वर्गीय गणपतराव देशमुख मांडत असताना महाराष्ट्राचे विधान भवन स्तब्ध होत होतं. वयाच्या शेवटच्या श्वासापर्यंत स्वर्गीय गणपतराव यांनी राजकारणाचे पावित्र्य जपलं. तसेच आपल्या पूर्ण हयातीमध्ये जोपासले.आम्हां तरुण आमदारांचे २५ वर्षांपूर्वी त्यावेळेस आणि आजही आदर्श गुरु म्हणून मार्गदर्शक म्हणून बहुजनांचा आश्रयदाता आधारस्तंभ म्हणून नेहमीच स्व.गणपतराव देशमुख सभागृहामध्ये आणि सभागृहाबाहेरही आम्हाला नेहमी मार्गदर्शन करत असे.एकदा विधानसभेमध्ये मी बोलत असताना  मी सभागृहामध्ये शेतकऱ्यांच्या बाबतीतला एक प्रश्न उचलून धरला तेव्हा स्व. गणपतरावांनी मला बोलवून माझ्या पाठीवर शाब्बासकी दिली नाना भाऊ तुम्ही छान बोललात. त्या शाब्बासकीची आठवण आजही माझ्या हृदयामध्ये आहे. सध्याच्या घडीला देशामध्ये राजकारणाचं दूषितिकरण चालू आहे.संपूर्ण भारत देशाला प्रेरणा आणि मार्गदर्शक ठरतील असे स्वर्गीय गणपतराव देशमुख यांचे वागणे बोलणे एवढेच नव्हे तर हिमालया एवढं कर्तुत्व असणारा माणूस मी माझ्या राजकीय जीवनामध्ये आजवर पाहिलेला नाही.हीच खरी स्व.गणपतरावांची कमाई आहे. सध्याच्या स्थितीला सांगोल्याचं नाव घेतलं की लोक टीव्ही बंद करतात अशी परिस्थिती झाली आहे. खरंच महाराष्ट्राला आणि देशाला स्व.गणपतराव देशमुख यांच्या राजकीय शिदोरीची गरज आहे. ठासून यावेळी नानाभाऊ पटोले यांनी सांगितले.नानाभाऊ पटोले यांनी एक किस्सा सांगितला २००३ ला स्वर्गीय गणपतराव देशमुख त्यावेळचे तत्कालीन मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांचे मंत्रिमंडळामध्ये गणपतराव देशमुख हे मंत्री होते. सरकारमध्ये अचानक गडबड झाली.स्वर्गीय गणपतराव देशमुख यांच्याकडे त्यावेळी शासकीय गाडी म्हणून लाल दिव्याची अंम्बेशेटर गाडी होती. सातारमध्येच सदरची शासनाची गाडी गणपतरावांनी सोडून दिली. असा हा दूरदृष्टीचा नेता, बहुजनांचा कैवारी,महाराष्ट्रामध्ये कधीही कदापिही होणार नाही. गणपतरावांच्या कारकिर्दीला कर्मभूमीला येण्याचं मला भाग्य लागले. तुमच्या परिवाराला भेटण्याचे भाग्य लाभले. माईंना भेटून भारावून गेलो. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी  इथून पुढील काळात कोणत्याही अडचणीच्या सुखदुःखाच्या काळात गणपतराव देशमुख यांच्या परिवाराच्या पाठीशी उभा राहील असं आश्वासित केले. यावेळी काही काळ भावनिक आणि दुःखमय वातावरण तयार झाले. शेवटी जाता जाता बाबासाहेब तुम्ही चांगलं काम करता असंच काम अविरतपणे करा.असं नेतृत्व सांगोला तालुक्यातील मध्ये पुन्हा निर्माण करा.त्यांचे विचार जिवंत ठेवण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे.हीच खरी स्वर्गीय आबासाहेबांना श्रद्धांजली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!