खा.रणजितसिंह निंबाळकरांच्या पाठपुराव्याला यश, विकास कामांसाठी ९ कोटींचा निधी मंजूर – चेतनसिंह केदार सावंत

सांगोला (तालुका प्रतिनिधी): ग्रामीण भागात गावांतर्गत मूलभूत सुविधा देण्यासाठी लेखाशिर्ष २५१५ योजनेअंतर्गत जिल्ह्यातील सांगोला, माळशिरस, माढा आणि करमाळा तालुक्यातील १०० विकास कामांसाठी तब्बल ८ कोटी ९० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी दिली.
सांगोला तालुक्यातील वासूद हेमंत शिंदे घर ते सौदागर नकाते घर रस्ता ५ लाख, एखतपुर अंबिका मंदिर पेव्हिंग ब्लॉक १० लाख, कटफळ सभामंडप १० लाख, कडलास शिवाजीनगरमध्ये सभामंडप १० लाख, कोळा म्हसोबा मंदिरासमोर सभामंडप १० लाख, खिलारवाडी जि.प. शाळेसमोर पेव्हींग ब्लॉक ५ लाख, घेरडी येथे मारुती मंदिरासमोर सभामंडप १० लाख, चिंचोली-धायटी रोड ते बंडगर वस्ती रस्ता ५ लाख, चीनके अगतराव मिसाळ घर ते प्रकाश काटे घर रस्ता ५ लाख, जवळा गणपती मंदिरासमोर सभामंडप १० लाख, जवळा कोळी शाळा ते साळेवस्ती रस्ता १० लाख, तिप्पेहाळी सांगोलकर वस्ती ते काटवान वस्ती रस्ता १० लाख, धायटी शहाजी भोसले वस्ती ते संजय भोसले रस्ता ५ लाख, नाझरे-आटपाडी रोड ते रायचुरे वस्ती रस्ता ५ लाख, पारे स्मशानभूमीत पेव्हिग ब्लॉक ५ लाख, बलवडी सभामंडप १० लाख, बामणी अंतर्गत रस्ते डांबरीकरण १० लाख, भोपसेवाडी बिरोबा मायाक्का मंदिर परिसर काँक्रिटीकरण व पेव्हींग ब्लॉक १० लाख, मंगेवाडी रामोशी वस्तीवर व्यायामशाळा १० लाख, महूद गोडसे वस्ती ते येडगे वस्ती रस्ता १० लाख, महूद गावठाण बंधारा ते माळी परीटवस्ती रस्ता ५ लाख, मांजरी चंदनशिवे घर ते विद्याधन निवास पर्यंत रस्ता ५ लाख, मानेगाव बाबर घर ते राजुरी रस्ता ५ पाच लाख, मेथवडे ते जुना शिरभावी रस्ता १० लाख, वाकी सभामंडप १० लाख, वाटंबरे गणपती मंदिरासमोर सभामंडप ५ लाख, वाढेगाव मरीआईमाता मंदिरासमोर पेव्हींग ब्लॉक ५ लाख, वासूद स्मशानभूमी सुधारणा १० लाख, शिवणे ग्रामपंचायत कार्यालयासमोर पेविंग ब्लॉक ५ लाख, सोनंद-डोंगरगाव-हणमंतगाव रस्ता १० लाख रुपये.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून विकासकामांना गती देण्यासाठी निधी मंजूर केल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी दिली.