प्रा. मुकुंद वलेकर यांना राज्यस्तरीय अग्रणी उत्कृष्ट ग्रामीण वाड.मय पुरस्कार प्रदान

उदनवाडी दिनांक 19 – माणदेश महाविद्यालय, जुनोनी येथील मराठी विषयाचे प्रा. कवी मुकुंद वलेकर यांना ‘शिवारमाती डॉट कॉम ‘या कवितासंग्रहासाठी अग्रणी प्रतिष्ठान,देशिंग ( ता. कवठेमहांकाळ )यांचा ‘राज्यस्तरीय अग्रणी उत्कृष्ट ग्रामीण वाङ्मय पुरस्कार ‘दिनांक 17 डिसेंबर,2023 रोजी प्रदान करण्यात आला.सदरचा पुरस्कार हा दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा,कोल्हापूरचे अध्यक्ष व ज्येष्ठ कवी प्रा.भीमराव धुळूबुळू यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला.
यावेळी 21 व्या अग्रणी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख प्रा.डॉ. नंदकुमार मोरे, अग्रणी साहित्य संमेलनाचे संस्थापक कवी दयासागर बन्ने,अध्यक्ष भरत खराडे,प्रा.डॉ.सागर पाटील,ज्येष्ठ साहित्यिक प्रा. गौतमीपुत्र कांबळे,देशिंगचे सरपंच प्रवीण पवार,हरोली गावच्या सरपंच रेश्मा पाटील ,दिनकर पाटील, मुक्त सृजन साहित्य पत्रिका, छत्रपती संभाजीनगर चे संपादक प्रा.डॉ.महेश खरात, ज्येष्ठ कवी धनंजय सोलंकर आदी मान्यवर उपस्थित होते. सन्मानचिन्ह,रोख रक्कम, मानाचा फेटा,शाल व पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप होते. ग्रामीण जीवनातील शेतकऱ्यांची सुख -दुःखे अत्यंत रोखठोकपणे प्रा. मुकुंद वलेकर यांनी’ शिवारमाती डॉट कॉम’ या कृषिकेंद्रित कवितासंग्रहातून प्रभावीपणे मांडली आहेत.
‘शिवारमाती डॉट कॉम ‘या कवितासंग्रहाला आतापर्यंत महाराष्ट्रातून सहा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल उदनवाडीचे ग्रामस्थ, शैक्षणिक,सामाजिक,साहित्य व राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी प्रा.मुकुंद वलेकर यांचे अभिनंदन केले आहे.