यशवंत हायस्कूल, शिरभावी येथे कै. सुभाषनाना पाटील यांची जयंती संपन्न

यशवंत हायस्कूल, शिरभावी येथे संस्थेचे मा.अद्यक्ष कै. सुभाषनाना पाटील यांची 65 वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री .पवार एस .सी .यांनी प्रतिमेचे पूजन केले व नानां विषयी त्यांच्या कार्याची माहिती विद्यार्थ्यांना दिली तसेच घाडगे सर आणि सुरवसे सर यांनी त्यांच्या राजकीय व सामाजिक कार्याची माहिती विद्यार्थ्यांना सांगितली.
कार्यक्रमाचे औचित्य साधून विद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना खाऊवाटप करण्यात आला .यावेळी विद्यालयाचे विद्यार्थी ,शिक्षक, शिक्षकेतर स्टाफ व ग्रामस्थ उपस्थित होते .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खेंडकर सर यांनी केले व आभार गळवे सर यांनी माणले.