जवळे विद्यालयात राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची पुण्यतिथी साजरी.

कै. सौ.वत्सलादेवी देसाई विद्यालय व कै.अण्णासाहेब घुले- सरकार कनिष्ठ महाविद्यालय जवळे या प्रशालेमध्ये राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.याप्रसंगी राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त प्राध्यापक ए जी गायकवाड व उपमुख्याध्यापक संजय पोळ यांच्या हस्ते राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी कुमारी भक्ती खराडे या विद्यार्थिनीने राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या जीवन कार्यावर भाषण केले. तसेच विद्यार्थ्यांना राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या विषयी माहिती देताना श्री.विजय लांडगे सर यांनी गाडगेबाबांचे आवडते भजन गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला म्हणून दाखवले. विद्यार्थ्यांनीही सुरात सूर मिसळून भजन गायले यावेळी विद्यार्थ्यांमध्ये मोठा उत्साह दिसून येत होता.
सदरप्रसंगी. प्राचार्य बाळासाहेब शिंदे सर, सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षिकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार श्री.बी.डी शिंदे सर यांनी मानले.