सांगोला तालुकामहाराष्ट्रशैक्षणिक

सांगोला विद्यामंदिर पूर्व प्राथमिक, प्राथमिक विद्यालय यांचा विविध गुणदर्शन कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

सांगोला विद्यामंदिर पूर्व प्राथमिक, प्राथमिक विद्यालय यांचा विविध गुणदर्शन कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.तत्पूर्वी सांगोल्याचे तहसीलदार मा.श्री.संतोष कणसे यांच्या हस्ते नटराजाच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले.यावेळी संस्था कार्यकारिणी सदस्या सौ. शीलाकाकी झपके,इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका कु. सरिता कापसे, प्राथमिकचे प्र.मुख्याध्यापक श्री. उदय बोत्रे, पूर्व प्राथमिकच्या मुख्याध्यापिका कु. रोहिणी महारनवर, बालक मंदिरच्या मुख्याध्यापिका सरिता देशमाने, मराठी माध्यमाचे सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री.चेतन कोवाळे इंग्रजी माध्यमाचे विभाग प्रमुख श्री.अजित मोरे,विद्यार्थी प्रतिनिधी कु. विराज टेळे विद्यार्थीनी प्रतिनिधी कु.श्रावणी लवांडे उपस्थित होते.

यावेळी विद्यार्थ्यांनी बहारदार अशी नृत्ये सादर केली. यामध्ये लोकनृत्य, पोवाडे, आदिवासी नृत्य,साऊथ इंडियन नृत्य तसेच विद्यार्थ्यांनी छ. शिवाजी महाराज यांची यशोगाथा नृत्यांच्या माध्यमातून सादर केली. वेगवेगळ्या प्रकारच्या सुंदर नृत्यांच्या सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मराठी व इंग्रजी माध्यमाचे सांस्कृतिक विभाग प्रमुख, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून श्री.एम.एन.विभुते,कु.एस.ए.नागरसे, सौ. आ. दि. वेदपाठक यांनी काम पाहिले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.समाधान शिंदे सर व श्री. मेहराज मण्यार सर यांनी केले.

चौकट- उदईक शुक्रवार दिनांक 22/12/2023रोजी सांगोला विद्यामंदिर इंग्लिश मेडिअम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा विविध गुणदर्शन कार्यक्रम होईल.तरी सांगोला शहरातील शिक्षण प्रेमी नागरिक , पालकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन मुख्याध्यापिका कु. सरिता कापसे मॅडम यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!