तिप्पेहळी गावच्या सरपंच पदी शेकापचे तानाजी नरळे यांची बिनविरोध निवड..

सांगोला तालुक्यातील तिप्पेहळी येथील ग्रामपंचायतच्या सरपंच पदी शेतकरी कामगार पक्षाचे तानाजी तुकाराम नरळे यांची बिनविरोध निवड झाली मावळते सरपंच अरुण बजबळकर यांनी ठरल्याप्रमाणे राजीनामा दिल्यामुळे ही निवडणूक प्रक्रिया पार पडली.
यावेळी नूतन सरपंच तानाजी नरळे यांचा ग्रामस्थांच्या वतीने शाल श्रीफळ फेटा देऊन सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला गावातील सर्व नेतेमंडळी निवडणूक निर्णय अधिकारी ग्रामसेवक उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.