सांगोला तालुकामनोरंजनमहाराष्ट्रशैक्षणिक

विद्यार्थ्यांच्या नृत्याने जिंकली उपस्थितांची मने

सांगोला विद्यामंदिर इंग्लिश मिडीयम स्कूलचा विविध गुणदर्शन कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न.

सांगोला विद्यामंदिर इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांच्या विविध गुण दर्शनाचा कार्यक्रम उत्साही वातावरणात संपन्न झाला. तत्पूर्वी वार्षिक स्नेहसंमेलनाच्या विविध गुण दर्शनाच्या कार्यक्रमाची सुरूवात परीक्षक एम.एन.विभुते हस्ते नटराजाच्या मूर्तीचे पूजन करून करण्यात आली.

 

यावेळी इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका कु. सरिता कापसे, प्राथमिकचे प्र.मुख्याध्यापक उदय बोत्रे, स्पर्धेचे परीक्षक शुभांगी नागरसे, केंगार सर,पूर्व प्राथमिकच्या मुख्याध्यापिका कु. रोहिणी महारनवर, बालक मंदिरच्या मुख्याध्यापिका सरिता देशमाने, मराठी माध्यमाचे सांस्कृतिक विभाग प्रमुख चेतन कोवाळे, इंग्रजी माध्यमाचे विभाग प्रमुख अजित मोरे, इंग्रजी माध्यमाचे विदयार्थीनी प्रतिनिधी वैष्णवी खंदारे, विदयार्थी प्रतिनिधी अमेय वलेकर प्राथमिक विद्यालयाचा विदयार्थी प्रतिनिधी कु. विराज टेळे विद्यार्थीनी प्रतिनिधी कु.श्रावणी लवांडे उपस्थित होते.

यावेळी विद्यार्थ्यांनी बहारदार अशी नृत्ये सादर केली. यामध्ये लोकनृत्य, पोवाडे,साऊथ इंडियन नृत्य, कोळी गीते,लावणी, विट्ठल महिमा तसेच महाराष्ट्राची गौरव गाथा, अशी बहारदार गाणी नृत्यांच्या माध्यमातून सादर केली व उपस्थितांची वाहवा मिळवली व मने जिंकली.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मराठी व इंग्रजी माध्यमाचे सांस्कृतिक विभाग प्रमुख, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून एम.एन.विभुते,कु.एस.ए.नागरसे, केंगार सर यांनी काम पाहिले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन थोरात मॅडम, घोगरे मॅडम, देवळे मॅडम यांनी केले.

 

आज शनिवार दिनांक 23/12/2023 रोजी सांगोला विद्यामंदिर पूर्व प्राथमिक, प्राथमिक विद्यालय व बालक मंदिर आणि इंग्लिश मेडिअम स्कूलचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ प्रमुख पाहुणे सोमनाथ गायकवाड, संस्था अध्यक्ष पी.सी.झपके, संस्थासचिव श्री.म.शं.घोंगडे यांच्या उपस्थित संपन्न होणार आहे. तरी सांगोला शहरातील शिक्षण प्रेमी नागरिक , पालकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन दोन्ही माध्यमाच्या मुख्याध्यापकांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!