उत्कर्ष प्राथमिक विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न…

माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान संचलित उत्कर्ष प्राथमिक विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन दिनांक 20 डिसेंबर 2023 रोजी उत्साहात पार पडले या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी तिन्ही विभागाचे मुख्याध्यापक , उपमुख्याध्यापक , पर्यवेक्षक , शिक्षक वृंद, विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या हस्ते व सर्वांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
कार्यक्रमाची सुरुवात ही गणेश वंदनेने झाली. या स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने विविध नृत्यातून मुलांच्या कलाविष्काराला संधी देण्यात आली.कार्यक्रमांमध्ये बालगीते, राजस्थानी नृत्य, शेतकरी नृत्य, वाघ्या मुरळी ,गोंधळी नृत्य,कोळी नृत्य,भक्तीगीतावर आधारीत नृत्य, भारुड, शिवराज्याभिषेक सोहळा व नृत्यातून सुंदर संदेश देणारी नृत्ये विद्यार्थ्यांनी सादर केली . त्याचप्रमाणे विविध देवतांच्या नृत्यांमुळे भक्तीमय वातावरण निर्माण झाले.यात हर हर शंभू,रामसियाराम, कृष्ण लिला अशा प्रकारचे नृत्य सादर करण्यात आले.या स्नेहसंमेलनाचे खास आकर्षण होते ते म्हणजे गाडीवाला आया घरसे कचरा निकाल हे गीत.या गीतातून स्वच्छतेचे महत्त्व हा संदेश दिला.
या कार्यक्रमासाठी संस्थाअध्यक्षा, मा.संजीवनीताई केळकर, संस्थेच्या कोषाध्यक्षा शालिनीताई कुलकर्णी, वसुंधराताई कुलकर्णी, शालिनीताई पाटील,श्रीकांत बिडकर सर माजी मुख्याध्यापिका संजीवनीताई भोसेकर, सुशीलाताई नांगरे-पाटील, विजयाताई खडतरे तसेच माजी शिक्षिका मंगलताई लाटणे सुमनताई कांबळे, धनश्रीताई देशपांडे,व पालक वर्ग मोठ्या संख्यानी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.