नाझरा विद्यामंदिर मध्ये शिक्षण सप्ताहाची उत्साहात सुरुवात

नाझरा(वार्ताहर):- राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त 21 जुलै ते 28 जुलै दरम्यान शिक्षण सप्ताहाचे आयोजन महाराष्ट्र शासनाच्या वतीने करण्यात आले आहेत.नाझरा विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजमध्ये मोठ्या उत्साहात शिक्षण सप्ताहाची सुरुवात करण्यात आली.
अध्ययन अध्यापन साहित्य दिवस या उपक्रमांतर्गत पर्यावरण विषयक जागरूकता वाढवणे, वृक्ष लागवड व संवर्धनाचे महत्त्व विशद करण. जलसाक्षरता त्याचबरोबर अध्ययन अध्यापनासाठी वापरल्या जाणाऱ्या विविध साहित्यांची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात आली. यावेळी प्रशालेत विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले.
सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मल्लिकार्जुन घोंगडे प्राचार्य बी एस माने,पर्यवेक्षक मधुकर धायगुडे, नाजरा विद्यामंदिर इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका मंगल पाटील, हरित सेना विभागाचे प्रमुख सोमनाथ सपाटे,सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत कै. गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या तैलचित्रास पुष्पहार समर्पित करून शिक्षण सप्ताहाची सुरुवात करण्यात आली. प्रशालेची विद्यार्थिनी दुर्गेश्वरी सोनवणे हिने जलसंवर्धन,वृक्ष संवर्धन,वृक्ष लागवड त्याचबरोबर वातावरणातील बदलांचा जागतिक परिणाम अशा विविध विषयांवर आपले विचार व्यक्त केले, तापमान वाढीसाठी कारणीभूत असणाऱ्या विविध घटकांची माहिती तिने विद्यार्थ्यांना दिली. त्यानंतर अध्ययन अध्यापनात विविध साहित्याचा असणारा वापर कशा पद्धतीने केला जातो,त्याचबरोबर हे साहित्य अध्ययनाच्या दृडीकरणासाठी कसे महत्त्वाचे आहे याबद्दल मराठी, गणित व विज्ञान विषय शिक्षकांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील जवंजाळ यांनी केले तर आभार पर्यवेक्षक मधुकर धायगुडे यांनी मानले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.