जवळे ग्रामपंचायत येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.

जवळे (वार्ताहर)जवळे ग्रामपंचायत येथे भारतीय प्रजासत्ताक दिन रविवार दिनांक 26 जानेवारी 2025 रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मा.आ.दीपक आबा साळुंखे- पाटील व युवानेते एडवोकेट यशराजे साळुंखे-पाटील तसेच इतर मान्यवरांच्या उपस्थितीत सरपंच सौ.सुषमाताई घुले घुले-सरकार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच या कार्यक्रमात जवळे केंद्रप्रमुख श्री.तानाजी साळे आयोजित प्रत्येक शाळेतील इयत्ता चौथी मधील अतिहुशार तीन विद्यार्थ्यांसाठी केंद्रस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षा 22 जानेवारी 2025 रोजी आयोजित केली होती.यासाठी जवळे व वाकी(घेरडी)केंद्रातील जिल्हा परिषदेच्या 30 शाळांतील 91 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
सदर परीक्षेत जवळे केंद्रातील मोहिते वस्ती,सांगोलकर(गवळी वस्ती) देशमुखवस्ती,जवळे मुलींची शाळा येथील एकूण सात विद्यार्थ्यांनी विशेष यश संपादन केले. त्याबद्दल विद्यार्थ्यांना प्रथम क्रमांक तीन हजार,द्वितीय क्रमांक दोन हजार, तृतीय क्रमांक एक हजार व उत्तेजनार्थ बक्षीस तसेच सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन आणि पालक,शिक्षकांचाही मा.आमदार दीपक आबा साळुंखे-पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
सदरप्रसंगीश्री.अरुणभाऊ घुले-सरकार, उपसरपंच श्री.नवाज खलिफा, श्री.आप्पासाहेब दादा देशमुख,श्री.साहेबराव दादा पाटील,श्री.बाबासो इमडे,श्री.बाबासाहेब देशमुख,श्री.विलास घुले सर,श्री.शिवाजी घुले सर,श्री.बाळादादा देशमुख,श्री.शंकर देशमुख,श्री.दत्तात्रय बर्वे,श्री.रामराव घाडगे,श्री.अनिल साळुंखे (चेअरमन) श्री.अनिल सुतार,श्री.किसन गायकवाड,श्री.आनंदा वाघमारे,श्री.शामराव गावडे सर,श्री.शहाजान आतार,श्री.राजू इनामदार,श्री.भारत सुरवसे,श्री.पवार मेजर,श्री.तोडकर मेजर तसेच ग्रामपंचायत सदस्य श्री.विजयकुमार ताळकर,श्री.विठ्ठल गयाळी,श्री.निसार शेख,श्री.विकास गावडे श्री.बंडू साळुंखे सौ.मीनाताई सुतार,श्रीमती निलावती म्हेत्रे जवळे केंद्रप्रमुख श्री.तानाजी साळे गुरुजी श्री.सचिन बागल गुरुजी,श्रीमती रतन कोळेकर मॅडम ग्रामपंचायत अधिकारी श्री. रसाळ भाऊसाहेब,मंडलाधिकारी श्री.जाधव साहेब,तलाठी कांबळे मॅडम,यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी,ग्रामस्थ तसेच जि. प. प्रा. मुलांची शाळा येथील शिक्षक,शिक्षिका,विद्यार्थी जवळे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे शिक्षक,शिक्षिका,विद्यार्थी तसेच एनसीसी कॅडेट्स,अंगणवाडी सेविका,बालचमू उपस्थित होते.