*सांगोला विद्यामंदिर स्नेहसंमेलन: बहारदार विविध गुणदर्शन व नाटिकेने आस्वादक मंत्रमुग्ध*

सांगोला ( प्रतिनिधी) सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजच्या वार्षिक स्नेहसंमेलनास मंगळवार दि. २६ डिसेबर २०२३ रोजी उत्साहात सुरुवात झाली. यामध्ये दुपारच्या सत्रात संपन्न झालेले सांगोला विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेजचे विविध गुणदर्शन व प्रशाला व ज्युनिअर कॉलेजच्या ‘हम नहीं सुधरेंगे’ या नाटिकेने उपस्थित आस्वादकांना मंत्रमुग्ध केले.
वार्षिक स्नेहसंमेलन पहिल्या दिवशी सकाळी आठ वाजता सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला संस्थापक अध्यक्ष कै.गुरूवर्य चं .वि.तथा बापूसाहेब झपके यांच्या तैलचित्रास विद्यार्थी शिक्षक दिन ज्युनिअर कॉलेज प्राचार्य श्रीशैल्य तेली,प्रशाला मुख्याध्यापक यशराज पवार यांच्या हस्ते व ज्युनिअर कॉलेज जनरल सेक्रेटरी अथर्व स्वामी, प्रशाला जनरल सेक्रेटरी वैष्णव वसमळे, ज्युनिअर कॉलेज विद्यार्थिनी प्रतिनिधी भारती बनकर, प्रशाला विद्यार्थिनी प्रतिनिधी साक्षी देवकते यांचे उपस्थितीत पुष्पहार समर्पित करण्यात आला .

यानंतर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थी शिक्षकांनी एक दिवसाचा शाळा चालवण्याचा अनुभव घेतला. यावेळी विद्यार्थ्यांचा उत्साह, आनंद,त्यांनी स्विकारलेली जबाबदारी सर्वाच्या नजरेत भरण्यासारखी होती. काही विद्यार्थ्यांनी पदाधिकारी,शिक्षकांचे तर काहींनी सेवकांचे काम करून श्रम प्रतिष्ठा जपण्याचा प्रयत्न केला. समरोपामध्ये विद्यार्थी शिक्षक व प्राचार्य यांनी आपल्या मनोगतात प्रत्यक्ष वर्गात अध्यापनासंदर्भातील आलेले अनुभव व्यक्त करताना वर्गात अध्ययनापेक्षा शिक्षक म्हणून अध्यापन करणे खूप जबाबदारीचे काम आहे असे मत व्यक्त केले. विद्यार्थी शिक्षक दिन यशस्वी होण्यासाठी प्रशाला व ज्युनिअर कॉलेजमधील विद्यार्थी शिक्षक दिन प्राचार्य, मुख्याध्यापक, विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी व विद्यार्थी शिक्षक दिन विभागातील विभाग प्रमुख व सहाय्यक शिक्षकांनी प्रयत्न केले.
दुपार सत्राचे विविध गुणदर्शन व नाटिका उद्घाटन संस्था कार्यकारिणी सदस्य ॲड विजयसिंह चव्हाण यांचे हस्ते नटराज पूजन व श्रीफळ वाढवून व परीक्षक प्रा. महेश विभुते यांचे हस्ते कै.गुरुवर्य बापूसाहेब व परीक्षक अनुपमा पाटणे यांचे हस्ते कै.बाईसाहेब झपके यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाले. यावेळी संस्थाध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके,परीक्षक चेतन कोवाळे, प्रशासकीय अधिकारी, स्नेहसंमेलन प्रमुख, सांस्कृतिक विभाग प्रमुख उपस्थित होते. यानंतर ज्युनिअर कॉलेजमधील विद्यार्थ्यांचा बहारदार विविध गुणदर्शन कार्यक्रम संपन्न झाला. यामध्ये वैयक्तिक नृत्य, सामुदायिक नृत्य, नकला व एकपात्री नाटक यासाठी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

तसेच नागेश भोसले दिग्दर्शित,अनिता घोंगडे व मकरंद अंकलगी सहाय्यक दिग्दर्शित ‘हम नहीं सुधरेंगे’ या नाटिकेने प्रेक्षकांना खळखळून व मनमुराद हसवले.व हसता हसता मौलिक प्रबोधन केले. सदर विविध गुणदर्शन कार्यक्रमासाठी ज्युनिअर कॉलेज सांस्कृतिक विभाग प्रा.राधा रिटे,प्रशाला सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रशांत रायचुरे व सांस्कृतिक विभागातील सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
स्नेहसंमेलन सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्य गंगाधर घोंगडे,उपमुख्याध्यापक लक्ष्मण विधाते, उपप्राचार्य शहिदा सय्यद, पर्यवेक्षक अजय बारबोले, पोपट केदार,बिभिषण माने यांचे मार्गदर्शनाखाली स्नेहसंमेलन प्रमुख प्रशाला नरेंद्र होनराव, स्नेहसंमेलन प्रमुख ज्युनिअर कॉलेज प्रा.धनाजी चव्हाण ,सर्व विभाग विभाग प्रमुख यांचेसह शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे योगदान महत्त्वपूर्ण होते.
आज शुक्रवार, दि. २७ डिसेंचर २०२३ रोजी सकाळी ८:०० वाजता प्रशाला व ज्युनिअर कॉलेजमधील विद्यार्थ्यांसाठी अल्पोपहार व फिशपॉंडस् अर्थात शेला पागोटे १०:०० वाजता फनफेअर, विज्ञान प्रदर्शन, कला प्रदर्शन व रांगोळी प्रदर्शनाचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन तर दुपारी २:०० वाजता प्रशालेतील विद्यार्थ्यांचा विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम होणार आहे.