sangolaeducationalentertainment
*सांगोला विद्यामंदिर स्नेहसंमेलन ; विविध गुणदर्शन सादरीकरणाने जिंकली उपस्थितांची मने*
सांगोला ( प्रतिनिधी) सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजच्या वार्षिक स्नेहसंमेलन २०२३- २४ दुसरा दिवस बुधवार दिनांक २७ डिसेंबर २०२३ रोजी दुपार सत्रामध्ये प्रशाला विविध गुणदर्शन सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली.
सकाळी प्रशाला व ज्युनिअर कॉलेजमधील विद्यार्थ्यांना अल्पोपहार देण्यात आला.त्यानंतर संगीत फिशपॉंडस,फिशपॉंडस अर्थात शेलापागोटे या कार्यक्रमाचा विद्यार्थ्यांना मनमुराद आनंद घेतला.शेला पागोट्याने हसता- हसता काहींचा आत्मगौरव झाला तर काहींना आत्मभानही आले.
सकाळी १०.०० वा. सूरूवातीला संस्थापक अध्यक्ष कै.गुरूवर्य चं.वि.तथा बापूसाहेब झपके यांच्या तैलचित्रास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार समर्पित करण्यात आला व आगारप्रमुख विकास पोपळे, दंतरोग तज्ञ डॉ.सुनिल नारनवर, मधुमती पाटील,संस्था सदस्या शीलाकाकी झपके यांचे शुभहस्ते फनफेअर, विज्ञान प्रदर्शन, रांगोळी प्रदर्शन,कला प्रदर्शन उद्घाटन झाले.यावेळी
संस्थासचिव मल्लिकार्जुन घोंगडे, संस्था खजिनदार शंकरराव सावंत, संस्था सदस्य दिगंबर जगताप,ॲड विशाल बेले यांची उपस्थिती होती.
दुपार सत्र प्रशाला विविध गुणदर्शन उद्घाटन परीक्षक प्रशांत मिसाळ यांचे हस्ते नटराज पूजन व श्रीफळ वाढवून झाले.यावेळी परीक्षक अतिश बनसोडे,कु.मृणाल राऊत उपस्थित होते.त्यानतर संपन्न झालेल्या विविध गुणदर्शनामध्ये वैयक्तिक नृत्य, लावणी, रिमिक्स व सामूहिक नृत्यामध्ये आदिवासी नृत्य, धनगरी गीत, कोळी गीत, वाघ्या मुरळी,गोंधळ गीत, गरबा नृत्य या विविध संस्कृतींचे दर्शन घडविणाऱ्या गीताच्या सादरीकरणाने व रिमिक्स गीताने आस्वादकांची मने जिंकली. ‘
या बहारदार कार्यक्रमाच्या आस्वादनासाठी सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला संस्था अध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके संस्था कार्यकारणी सदस्य सौ.शीलाकाकी झपके , सेवानिवृत्त प्राचार्य, उपमुख्याध्यापक,शिक्षक तसेच पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सांस्कृतिक कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सांस्कृतिक विभाग प्रशाला विभाग प्रमुख प्रशांत रायचुरे, ज्युनिअर कॉलेज सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.राधा रिटे व सांस्कृतिक विभागातील सर्व शिक्षकांचे तसेच सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्य गंगाधर घोंगडे, उपमुख्याध्यापक लक्ष्मण विधाते, उपप्राचार्य शहिदा सय्यद, पर्यवेक्षक अजय बारबोले,पोपट केदार बिभिषण माने,प्रशाला स्नेहसंमेलन प्रमुख नरेंद्र होनराव,ज्यूनिअर कॉलेज स्नेहसंमेलन प्रमुख प्रा.धनाजी चव्हाण यांचेसह सर्व विभाग प्रमुख व विभागतील शिक्षक, तसेच शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले.
—————————
– वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थी सहभाग घेतात,त्यातून त्यांच्या कलागुणांना वाव मिळतो.ही बाब कोशल्य विकासासाठी महत्वपूर्ण आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांनी प्रत्येक स्पर्धेत खेलाडू वृत्तीने सहभाग घेतला पाहिजे.अपयश आले तरी खचून न जाता पुन्हा प्रयत्न केले तर धवल यश मिळेल.
उद्घाटक कला प्रदर्शन, शीलाकाकी झपके
कार्य.सदस्या सां.ता.शि.प्र मंडळ, सांगोला
—————————-
आज गुरुवार दि.२८ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ११.०० वा.वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ लातूरचे प्रसिद्ध व्याख्याते डॉ.राजशेखर सोलापुरे यांचे शुभहस्ते व सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला अध्यक्ष प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांचे अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे.