सांगोला तालुका

स्व शारदादेवी साळुंखे पाटील (काकी) यांच्या पुण्यस्मरण दिनी ४१० रक्तदात्यांनी केले रक्तदान  ; विविध अध्यात्मिक कार्यक्रमांनी स्व. काकीचा प्रथम पुण्यस्मरण दिन संपन्न

सांगोला तालुक्याचे अध्यात्मिक विद्यापीठ अशी ओळख असलेल्या भगवतभक्त शारदादेवी साळुंखे पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरण निम्मित आयोजित रक्तदान शिबिरात ४१० रक्तदात्यांनी रक्तदान करून स्व शारदादेवी साळुंखे पाटील यांना अभिवादन केले.  जवळा ता सांगोला येथील श्री नारायण मंदिर येथे हे शिबिर संपन्न झाले. यावेळी सांगोला शहर आणि तालुक्यातील असंख्य नागरिकांनी या शिबिरास प्रतिसाद दिला.
भगवत भक्त शारदादेवी साळुंखे पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त रविवार दि ३ रोजी राज्यस्तरीय भजन स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेस राज्यभरातून तब्बल ६० ते ७० भजनी मंडळ सहभागी झाले होते. तर सोमवार दि ४ रोजी स १० ते १२ यावेळेत श्री नारायण मंदिर जवळा येथे ह भ प जयवंत बोधले महाराज यांचे कीर्तन पार पडले दु १२. वा. स्व शारदादेवी साळुंखे पाटील यांच्या प्रतिमेवर पुष्पवृष्टी करण्यात आली. या कार्यक्रमास संपूर्ण राज्यभरातून हजारो नागरिक उपस्थित होते. यावेळी सांगोला तालुक्यातील आदर्श माता आणि आदर्श कन्या या पुरस्कारांचे वितरण झाले. यावेळी स्व शारदादेवी साळुंखे पाटील यांच्या जीवनावर आधारित “शारदीय चांदणं” या स्मृतीग्रंथांचे मान्यवरांचे हस्ते प्रकाशन करण्यात आले. तसेच रविवार २ रोजी झालेल्या राज्यस्तरीय भजन स्पर्धाचे बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला.
मंगळवार दि.५ रोजी भगवतभक्त शारदादेवी (काकी) साळुंखे पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरणदिनानिमित्त आयोजित ‘भव्य रक्तदान शिबिराचे’ उद्घाटन डॉ. संभाजी पाचकवडे,मा.आ.दिपकआबा साळुंखे पाटील, जयमालाताई गायकवाड चारुशीला काटकर यांच्या शुभहस्ते व डॉ.अजिंक्य नष्टे,डॉ.शैलेश डोंबे,डॉ.सुशांत बनसोडे,डॉ.मकरंद येलपले, डॉ. सौ.शितल येलपले, डॉ. सौरभ अजळकर, डॉ.अतुल बोरोटे,डॉ.धनाजी जगताप, डॉ. राहुल इंगवले,डॉ.शंभू साळुंखे, डॉ.महेश लिगाडे,डॉ. निलेश इंगवले,डॉ.पियुष साळुंखे यांच्यासह प्रतिष्ठित मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. तर सायं ५ ते ७ यावेळेत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती देशमुख तथा इंदुरीकर महाराज यांचे कीर्तन पार पडले या कीर्तनास सांगोला तालुक्यातील हजारो भाविक भक्त उपस्थित होते. यावेळी इंदुरीकर महाराज यांनी स्व. शारदादेवी साळुंखे पाटील यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. अध्यात्मिक क्षेत्रात स्व काकीनी अध्यात्मात केलेल्या योगदानाचे इंदुरीकरांनी तोंड भरून कौतुक केले.
ठळक बाबी 
१) स्व शारदादेवी साळुंखे पाटील यांनी सलग ४० वर्षे आळंदी ते पंढरपूर पायी वारी केली.
२) सलग ४० वर्षे जवळा ते पंढरपूर माघी वारी पायी पूर्ण केली.
३) चालूवर्षी पासून आषाढी एकादशीला स्व शारदादेवी साळुंखे पाटील जवळेकर, सांगोला जि. सोलापूर या नावाने माऊलींच्या पालखी बरोबर पायी दिंडीची सुरुवात

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!