वझरे येथील दत्त जयंती मध्ये दागिने चोरणार्या अट्टल चार चोरट्यांना अटक

सांगोला (प्रतिनिधी):-दत्त जयंती निमित्त वझरे ता.सांगोला येथे सात जणांच्या गळ्यातील 93 हजार रुपये किमतीचे दागिने चोरणार्या अट्टल 4 चोरट्यांना पोलिसांनी पकडून ताब्यात घेतल्याची घटना मंगळवार दि. 26 डिसेंबर रोजी नाझरे ता. सांगोला येथे घडली आहे.
अमोल केंगार रा चोपडी ता सांगोला हे सांगोला नगरपालीकेत कंत्राटी कामगार म्हणून नोकरीस आहेत ते मंगळवार दि.25 डिसेंबर रोजी दत्त जयंती असलेमुळे नाझरे वझरे ता.सांगोला येथील श्री समर्थ संजीव महाराज देवस्थान येथील यात्रेकरीता आई व दोन मुलांना घेऊन सकाळी 11 वा सुमारास गेले होते दत्त मंदीरात फुले टाकुन मुलांना घेवुन दर्शन रांगेत जात असताना केंगार यांनी त्यांच्या मुलास खांदयावर घेवुन ते नारळ फोडणेकरीता उभे असताना मुलगा स्वराज हा ओरडलेने केंगार यांनी मागे पाहीले तेव्हा एक इसम गर्दीतून पुढे चालला होता मुलाला खांदयावरून खाली घेवुन पाहीले तेव्हा त्याचे गळ्यातील काळ्या गोफात ओवलेले बदाम नसलेचे दिसले त्यानंतर केंगार यांनी दोन्ही मुलांना व आईस गर्दीतुन बाहेर काढून सुरक्षीत ठिकाणी नेले व पुन्हा त्या इसमाचा शोध घेत असताना दर्शन रांगेत महीलांचे पाठीमागे असलेल्या इसमाचा संशय आल्याने व खात्री झालेनंतर त्यास पकडले तेव्हा इतरही भावीक जमा झाले त्यांना केंगार यांनी घडला प्रकार सांगीतलेनंतर त्यांनी मारहाण करणेस सुरवात केली तेव्हा तेथे पोलीस आले त्यांनी त्या इसमास ताब्यात घेवुन लोकांना मारहाण करणेपासुन रोखले दरम्यान मंदीर परीसरात आणखी कांही लोकांचे दागीने चोरल्याची गर्दीत चर्चा होवुन गर्दीतील लोकांनी आणखी तिन इसमांना मारहाण करीत पोलीसाजवळ आणले तेव्हा त्यांनाही पोलीसांनी ताब्यात घेवुन मारहाण करणेपासुन परावृत केले पोलीसांनी त्या चार जणांना नाझरा येथील पोलीस ठाणेत घेवुन आले.
याबाबत अमोल केंगार यांनी 5 हजार रुपये किमतीचे गळ्यातील सोन्याचे बदाम,20 हजार रू.किमतीचे मालन मोहीते रा बलवडी यांचे गळ्यातील सोन्याचे मंगळसुत्र,20 ह. रू.किमतीचे शांताबाई पवार रा नाझरे यांचे गळ्यातील सोन्याचे मंगळसुत्र ,20 ह. रू.किमतीचे हिराबाई बाबर रा चोपडी यांचे गळ्यातील सोन्याचे मंगळसुत्र,20 ह. रू.किमतीचे द्रोपदी मिसाळ रा पाचेगाव खु यांचे गळ्यातील सोन्याचे मंगळसुत्र,3 ह. रू.किमतीचे कुसुम धोकटे यांचे गळयातील सोन्याचे पोत व 5 ह.रू. किमतीचे दत्तात्रय आलदर याचे गळयातील सोन्याचे बदाम असा सुमारे 93 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरुन नेल्याबाबत फिर्याद दाखल केली आहे.पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे वाहन ताब्यात घेतले आहे व चार जणांना अटक केली आहे.