जि.प.प्रा.शाळा बलवडी व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी श्री बाळासो खुळपे व उपाध्यक्षपदी श्री चांगदेव शिंदे यांची निवड.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बलवडी येथील शाळा व्यवस्थापन समितीची पुनर्रचना आज करण्यात आली. शाळेचे मुख्याध्यापक श्री मनोहर पवार सर यांनी सर्व पालक व पदाधिकारी यांचे स्वागत केले.शाळा व्यवस्थापन समिती पुनर्रचना निवडीचे नियम व निकष व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष सदस्य यांच्या शाळेविषयी असणाऱ्या जबाबदाऱ्यांची सर्वप्रथम माहिती देण्यात आली.
शाळा व्यवस्थापन समितीची पुनर्रचना करण्यासाठी इयत्ता पहिली ते चौथीचे पालक, सरपंच मा.ज्ञानेश्वर राऊत, उपसरपंच समाधान शिंदे, ज्येष्ठ नेते मा. श्री विजयदादा शिंदे, मा. सरपंच श्री बाळासाहेब शिंदे मा. श्री सत्यजित लिगाडे सरकार ग्रामपंचायत सदस्य रविराज शिंदे, श्री बाबासाहेब पालसांडे, श्री शिवाजी शिंदे, श्री कृष्णदेव कारंडे गुरुजी, प्रगतशील बागायतदार श्री मनोहर राऊत, श्री मारुती शिंदे, श्री वसंत पालसांडे , श्री नवनाथ कारंडे,श्री बालिश सरोदे, माजी.सरपंच गणेश कमले, सौ.कोमल कवडे,सौ लक्ष्मी हातेकर, सौ विद्या करडे,शाळा व्यवस्थापन समिती माजी उपाध्यक्ष श्री निलेश राऊत यांच्या उपस्थितीत निवडी पार पडल्या. शाळा व्यवस्थापन समितीच्या नूतन अध्यक्षपदी श्री बाळासो खुळपे तर उपाध्यक्षपदी श्री चांगदेव शिंदे यांची निवड करण्यात आली. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष सर्व सदस्य यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
ज्येष्ठ नेते मा.विजयदादा शिंदे यांनी आपल्या मनोगतात आजच्या स्पर्धेच्या युगात गुणवत्ता वाढीसाठी पालकांनी, सदस्यांनी व सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्याकडे लक्ष देण्याची गरज व्यक्त केली व सर्व सदस्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.माजी सरपंच मा. बाळासाहेब शिंदे यांनी शाळा विद्यार्थ्यांसाठी राबवत असलेल्या उपक्रमांचे कौतुक केले अध्यक्ष व सर्व सदस्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी गावचे सरपंच माननीय श्री ज्ञानेश्वर राऊत, नूतन अध्यक्ष श्री बाळासो खुळपे उपाध्यक्ष श्री चांगदेव शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी शाळेतील शिक्षक श्री गोरखनाथ बनसोडे सर, श्री विजयकुमार शिंदे सर, श्री सागर गुरव सर, श्रीमती योगिता शांत मॅडम, स्वाती पाटील मॅडम, श्रीमती सोनल सावंत मॅडम सर्व शिक्षक उपस्थित होते. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये सदर निवडी पार पडल्या. शाळेतील शिक्षक श्री सागर गुरव सर यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.