वसंतराव अण्णांनी सामान्य माणसांच्या जीवनात वसंत फुलविला-सुप्रसिद्ध व्याख्याते डॉ. यशवंत पाटणे

जन्म व मृत्यू कोणाच्या हातात नाही परंतु त्यामध्ये आपण कोणती मूल्ये जपतो हे महत्त्वाचे असून, त्याप्रमाणे वसंतराव अण्णांनी दुष्काळी परिस्थितीत सांगोल्या सारख्या ठिकाणी असताना सभापती सूतगिरणी व शैक्षणिक संस्था उभारून, शेती, सहकार शिक्षणामध्ये प्रगती केली व गोरगरीब मुलांच्या शिक्षणासाठी शाळा सुरू करून ज्ञानाचा रंग भरला व सामान्य माणसाच्या जीवनात आनंद वसंत फुलविला असे मत सुप्रसिद्ध व्याख्याते प्राचार्य डॉ.यशवंत पाटणे यांनी श्रीधर कन्या प्रशाला व ज्युनिअर कॉलेज स्नेहसंमेलन प्रसंगी व कै वसंतरावजी पाटील यांच्या 25 व्या स्मृती समारोह प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून व्यक्त केले अध्यक्ष स्थानी पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ बाबासाहेब देशमुख हे होते.
आबासाहेबांनंतर डॉक्टर बाबासाहेब व वसंतराव पाटील यांच्यानंतर सौ सीता देवी ही कुटुंबे त्यांचा वारसा योग्य रीतीने चालवत आहेत व आज पंचवीस वर्षानंतर सुद्धा त्यांचे नाव सर्वजण घेत आहेत,अण्णांचे कार्य हे कर्मवीरा सारखे होते व त्यांचा वारसा वसा पुढील पिढीला समजावा यासाठी ग्रंथ तयार करा व त्यातून माणसे उभे करा यातूनच ज्ञानाचे व श्रमाचे नाते कळेल असा मौलिक सल्लाही डॉ यशवंत पाटणे यांनी यावेळी विद्यार्थी पालक शिक्षक व अनेक मान्यवरांसमोर दिला. आजकाल मूल्यहीन राजकारणामुळे सर्वत्र बिघाडी होत आहे व यासाठी आबासाहेब आणि अण्णांचा आदर्श घ्या असे सांगितले. सुरुवातीस समाधी दर्शन तेलचित्राचे उद्घाटन, दीपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्राचार्य यास्मिन मुल्ला स्नेहसंमेलन प्रमुख प्रा विजय गोडसे, नवनाथ बंडगर सर बंडोपंत येडगे यांनी मत व्यक्त केले. यावेळी प्रमुख पाहुण्यांचा प्राचार्य यास्मिन मुल्ला व शिक्षक बंडोपंत येडगे शहाजान मुलाणी सर यांनी केला.
आबासाहेब मुंबईला जाताना येथील सर्व जबाबदारी अण्णा व लिगाडे तात्यावर सोपवत होते व त्यांचे मोठे योगदान होते परंतु आज राजकारण पदासाठी होत आहे विकासासाठी नाही व असे होता कामा नये असे अध्यक्ष भाषणात डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी सांगितले. यावेळी प्रशाला आदर्श विद्यार्थी समर्थ पाटील व कॉलेज विद्यार्थिनी अश्विनी बंडगर यांचा व प्रशालेतील वेगवेगळ्या क्षेत्रात ठसा उमटवणारे शिक्षक शिवभूषण ढोबळे सर, प्रा . विजय गोडसे सर, सिद्धार्थ मोटे सर, पुनम चव्हाण मॅडम, विद्यार्थी मयुरेश बाबर तसेच इतर क्षेत्रात नावलौकिक मिळालेला विद्यार्थ्यांचा ही प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी जि प सदस्य दादासो बाबर, माजी सरपंच शामराव वाघमारे, माजी प्राचार्य सुबराव बंडगर, माजी प्राचार्य प्रकाश परिचारक, पर्यवेक्षक मधुकर धायगुडे,, माजी उपसभापती सुनील चौगुले, शिक्षक नेते अशोक पाटील, डॉक्टर शिवाजीराव ढोबळे, प्रा . सुनील चौगुले सर, सहसचिव मुकुंद पाटील, सूतगिरणी संचालिका सीता देवी चौगुले, सोसायटी चेअरमन सुनील बनसोडे, वाय चेअरमन राजाभाऊ कोळेकर, शिक्षक सोसायटी चेअरमन नयना पाटील, माजी सरपंच गोरख बंडगर, सरपंच नवनाथ बनसोडे, उपसरपंच मधुकर आलदर, ग्रामपंचायत सदस्य संजय सरगर, गणी सो काझी, शशिकांत पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष शिवाजी सरगर, युवा नेते राजेंद्र बंडगर, रविराज बंडगर, समाधान लाडे, दत्तात्रय गोडसे सर, शिवया स्वामी सर,, लक्ष्मण ढोबळे राजू गडहिरे, पालक, विद्यार्थी, शिक्षक व पडद्यामागचे शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. विजय गोडसे, शिवभूषण ढोबळे तर आभार शिक्षक दुर्योधन आलदर यांनी मानले.