“कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर” श्रीमती गीता बनकर महिला शिक्षण शास्त्र महाविद्यालय सांगोला येथे संपन्न

सांगोला तालुका विधी सेवा समिती व विधिज्ञ संघ सांगोला यांच्या संयुक्त विद्यमाने कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर बुधवार दिनांक 27 /12 /2023 रोजी , श्रीमती गीता बनकर महिला शिक्षण शास्त्र महाविद्यालय महाविद्यालय सांगोला येथे संपन्न झाले , या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमुख दिवाणी न्यायाधीश क स्तर तथा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सांगोला , माननीय श्रीमती बी एम पोतदार मॅडम होत्या . तर सांगोला विधीज्ञ संघ चे अध्यक्ष माननीय अडवोकेट डीबी घाडगे यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवली, कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व प्रतिमापूजनाने झाली त्यानंतर सर्व मान्यवरांचे महाविद्यालयाच्या वतीने स्वागत करण्यात आले,
कार्यक्रमाच्या प्रस्तावनेमध्ये सांगोला विधीज्ञ संघाचे सदस्य एडवोकेट जी एल भाकरे यांनी कायद्याचे ज्ञान सर्वांनी घेऊन सक्षम व्हावे असे सांगितले, त्यानंतर उपस्थित प्रमुख मार्गदर्शक एडवोकेट श्री ए एस पटेल यांनी जागतिक मानव अधिकार दिवस याविषयी मार्गदर्शन करत असताना सर्वांनी मानव अधिकारांबाबत अधिक माहिती घेतली पाहिजे असे सांगितले तसेच जागतिक आणि राष्ट्रीय पातळीवर ती कोणकोणते मानव अधिकार बाबत कायदे आहेत ते सांगितले, l त्यानंतर सांगोल्यातील जेष्ठविधीज्ञ व प्रमुख मार्गदर्शक एडवोकेट श्री व्ही बी चव्हाण यांनी जागतिक एड्स दिवस याविषयी मार्गदर्शन केले त्यामध्ये त्यांनी एड्स या रोगाची कशाप्रकारे सुरुवात झाली त्याचा कसा प्रसार झाला त्याची लक्षणे काय आहेत व तो थांबवण्यासाठी कशाप्रकारे जनजागृती केली पाहिजे हे सांगितले, त्यानंतर प्रमुख मार्गदर्शक एडवोकेट व्ही एस गायकवाड यांनी पोक्सो कायदा ( लैंगिक गुन्ह्यापासून बालकांचे संरक्षण करणारा कायदा 2012 ) याविषयी मार्गदर्शन केले यामध्ये महिला व बालके यांचे विरुद्ध कशाप्रकारे लैंगिक गुन्हे घडतात व त्यांना कशाप्रकारे पोक्सो कायद्याद्वारे संरक्षण देण्यात आले आहे हे सांगितले त्यानंतर सांगोला न्यायालयातील कर्मचारी राहुल बिराजदार यांनी आपल्या मनोगत मधून लैंगिक शिक्षण तसेच कायद्याविषयक लोकांमध्ये जनजागृती झाली पाहिजे असं मत व्यक्त केलं