*जीवनात मंतरलेल्या क्षणांचा आस्वाद घ्या – डॉ.राजशेखर सोलापुरे*
सांगोला विद्यामंदिर वार्षिक स्नेहसंमेलन पारितोषिक वितरण समारंभ संपन्न

सांगोला ( प्रतिनिधी) जीवनाच्या रंगमंचावर खूप काही शिकावं लागतं कधी कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागते तर कधी विजयाचा महोत्सव साजरा करावा लागतो.आपल्या अंगी असणाऱ्या विविध गुणांचा विकास हा शालेय व कॉलेज जीवनातच होत असतो या काळात होणाऱ्या विविध गुणदर्शनच्या कार्यक्रमांमधून आपल्या आत असलेल्या विविध कला कौशल्यांना विकसित करण्याची संधी असते.कॉलेजचे जीवन असेल किंवा शालेय जीवन असेल या जीवनातील दिवस हे आपल्या आयुष्यात मंतरलेले दिवस असतात स्वतःला ओळखण्याचे दिवस असतात स्वतःला सिद्ध करण्याचे दिवस असतात त्यामुळे अशा मंतरलेल्या क्षणांचा आस्वाद घ्यावा असे प्रतिपादन महाराष्ट्रातील ख्यातनाम वक्ते डॉ.राजशेखर सोलापुरे यांनी केले.सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजच्या वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभाच्या कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.यावेळी व्यासपीठावर सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रा.प्रबुध्दचंद्र झपके, संस्था सचिव म.शं. घोंगडे,संस्था सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके, खजिनदार शंकरराव सावंत,संस्था सदस्य ॲड विजयसिंह चव्हाण, दिगंबर जगताप,प्राचार्य गंगाधर घोंगडे, उपमुख्याध्यापक लक्ष्मण विधाते, उपप्राचार्य शहिदा सय्यद, सर्वोत्कृष्ट विद्यार्थी,पालक, एनसीसी कॅडेट, विद्यार्थी पालक उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कै. गुरुवर्य बापूसाहेब झपके व बाईसाहेब झपके यांच्या प्रतिमेस प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते पुष्पहार समर्पित करण्यात आला.प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा.धनाजी चव्हाण यांनी करून दिला.शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मधील अहवालाचे वाचन उपप्राचार्य शहिदा सय्यद यांनी केले.प्रशाला व ज्युनिअर कॉलेज सर्वोत्तम विद्यार्थी निवड अहवालाचे वाचन उन्मेश आटपाडीकर यांनी केले.यानुसार प्रशालेचा सर्वोत्तम विद्यार्थी म्हणून सार्थक नवनाथ तळे (इ.१० वी ब) तर ज्युनिअर कॉलेजमधून सृष्टी सुनील लिगाडे ( इ.११ वी संयुक्त कला ) ) यांची निवड झाल्याबद्दल पालकांसमवेत प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते चांदीचे पदक , प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आला. तसेच सार्जंट अंजुम बालेखान मुलाणी,
सार्जंट राघव भारत हंबीरराव यांचा एन.सी.सी.बेस्ट कॅडेट म्हणून सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला
पुढे बोलताना डॉ.सोलापुरे म्हणाले संस्थापक अध्यक्ष कै. गुरुवर्य बापूसाहेब झपके यांनी या परिसरातील मुलांची शिक्षणाची सोय व्हावी म्हणून अनेक ठिकाणी शाळा स्थापन केल्या. त्यामधून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी तत्त्वनिष्ठता ठेवून प्रयत्न केले.काही ठिकाणच्या शाळा समाजाला दान दिल्या.या अलौकिकतेचे कौतुक करत तोच वसा विद्यमान अध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके सरांनी कायम ठेवला आहे. त्यामुळेच या शाळेतून आजही दर्जेदार शिक्षण मिळत आहे हे विद्यार्थ्यांनी लक्षात घेऊन आपली स्वप्ने सत्यात उतरवण्यासाठी सकारात्मकता ठेवावी असे सांगत. स्वतःचा आत्मप्रकाश,आव्हानाला सामोरे जाणे , प्रेमाचा अर्थ आणि अन्वयार्थ ,माणुसकी या संदर्भाने अनेक उदाहरणे,दाखले देत गोष्टींच्या, कवितेच्या माध्यमातून हाशा, टाळ्या वसूल करत मौलिक प्रबोधन केले.
यावेळी शैक्षणिक वर्ष सन २०२३-२४ मधील वर्षभरातील, विविध विभागातील स्पर्धेमध्ये पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते व कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके व सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके यांचे उपस्थितीत बक्षिस व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
यासंदर्भातील निवेदन वैभव कोठावळे, सुनील भोरे,चैतन्य कांबळे ,आशुतोष नष्टे, प्रा.विजयकुमार सासणे,प्रा.प्रसाद खडतरे यांनी केले. या पारितोषिक वितरण समारंभासाठी सेवानिवृत्त प्राचार्य, उपमुख्याध्यापक, उपप्राचार्य,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी,पालक, गावातील नागरिक,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य गंगाधर घोंगडे यांनी केले, सूत्रसंचालन उन्मेश आटपाडीकर यांनी केले तर उपमुख्याध्यापक लक्ष्मण विधाते यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्य गंगाधर घोंगडे उपमुख्याध्यापक लक्ष्मण विधाते उपप्राचार्य शहिदा सय्यद पर्यवेक्षक अजय बारबोले, पोपट केदार, बिभिषण माने,प्रशाला स्नेहसंमेलन प्रमुख नरेंद्र होनराव, ज्युनिअर कॉलेज स्नेहसंमेलन प्रमुख प्रा.धनाजी चव्हाण यांचेसह सर्व विभाग विभाग प्रमुख, सहाय्यक व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले.