महाराष्ट्र निवडणुकीबाबत निवडणूक आयोगाची महत्त्वाची माहिती, तब्बल 11 पक्षांशी चर्चा
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या नेतृत्वाखाली पथक दोन दिवसांपासून महाराष्ट्रात आहे. आज (शनिवारी) निवडणूक आयुक्तांनी पत्रकार परिषद घेत या दोन दिवसांच्या दौऱ्यात 11 पक्षांची भेट घेत निवडणुकीबाबत त्यांचे मत जाणून घेतल्याचे सांगितले.
सणांचा विचार करून निवडणूक घ्या, अधिकाऱ्यांच्या बदल्या या निष्पक्ष पद्धतीने करा, पोलिंग एजंट हा त्याच पोलिंगमधील असावा,
पैशांच्या व्यवहारावर लक्ष द्या, पोलिंगवर मतदारांना मोबाईल घेऊन जाण्यास बंदी आहे त्यामुळे पोलिंग बूथवर त्यांचा मोबाईल ठेवण्याची व्यवस्था असावी, असा सूचना राजकीय पक्षांनी केल्याचे राजीव कुमार यांनी सांगितले.
निवडणुक आयोगाने काँग्रेस, बसपा, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना, शिवसेना (UBT), मनसे, सीपीए आदी पक्षांशी चर्चा केली.