सांगोला तालुका

सूर्योदय मॉल आणि वस्त्र निकेतन च्या भाग्यवान कुपनची येत्या सोमवारी सोडत

        ऑल्टो कारचा भाग्यवान विजेता कोण याची सर्वांना उत्सुकता . 

सांगोला प्रतिनिधी….   अल्पावधीतच ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले  व  42 हजार स्क्वेअर फुटाचे पश्चिम महाराष्ट्रातील नामवंत खरेदी दालन म्हणून नावारूपास आलेले सूर्योदय मॉल आणि वस्त्र निकेतनच्या वतीने व्यवसाय वृद्धीकरिता खास दीपावली निमित्त तब्बल 251 बक्षिसांचा धमाका आयोजित करण्यात आलेला होता. दिनांक 1 ऑक्टोबर 2023 रोजी पासून सुरू करण्यात आलेल्या भाग्यवान कुपन योजनेचा दिनांक 31 डिसेंबर २०२३  पर्यंत बक्षीस कुपन प्राप्त करण्याचा कालावधी होता. यामध्ये जवळपास 20 हजाराहून अधिक ग्राहकांनी या योजनेची भाग्यवान कुपने प्राप्त केलेली आहेत. सूर्योदय मॉल आणि वस्त्र निकेतन मध्ये कोणत्याही वस्तूंसाठी प्रत्येक दोन हजारांच्या खरेदीवर एक भाग्यवान कुपन देण्यात आले आहे. यामध्ये एक ऑल्टो कार, एक इ – बाईक, एक एलईडी, एक फ्रिज, एक एक्वागार्ड, एक सायकल,  पंधरा मिक्सर, तीस कुकर आणि दोनशे भिंतीवरील घड्याळे अशा तब्बल 251 बक्षिसांचा भव्य धमाका सूर्योदय मॉल आणि वस्त्र निकेतन च्या वतीने आयोजित करण्यात आलेला आहे.  या बक्षीस योजनेची सोडत मकर संक्रातीच्या दिवशी येत्या सोमवारी सायंकाळी ठीक पाच वाजता सांगोल्यातील वाढेगाव नाका, मंगळवेढा रोड येथील सूर्योदय मॉल आणि वस्त्रनकेतनच्या भव्य प्रांगणामध्ये संपन्न होणार असल्याची माहिती सूर्योदय उद्योग समूहाचे संस्थापक अनिलभाऊ इंगवले यांनी दिली.

 

 

यावर्षी नव्याने सुरू झालेल्या या मॉलमुळे सांगोला शहर , तालुका आणि जिल्ह्याच्या परिसरातील ग्राहकांची मोठी सोय झालेली असून किराणा, भुसार, फुटवेअर ,प्लास्टिक ,क्रोकरी , गिफ्ट आर्टिकल्स ,भांडी यासह स्पेशल साडी विभाग, सूटिंग शर्टिंग, नवरदेव दालन, नवरी दालन, लेडीज वेअर, मेन्स वेअर, किड्स अशा कपड्यांमधील सर्व व्हरायटी एकाच छताखाली उपलब्ध झालेल्या आहेत. आकर्षक डिस्प्ले , विनम्र कर्मचारी वृंद, प्रशस्त पार्किंग अशी अनेक वैशिष्ट्ये असलेल्या या मॉल कडे ग्राहकांचा ओघ दिवसेंदिवस वाढत चालला असून सोमवारी सायंकाळी संपन्न होणाऱ्या भाग्यवान कुपन सोडत कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन डॉ. बंडोपंत लवटे, जगन्नाथ भगत गुरुजी आणि सुभाष दिघे गुरुजी यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!