सांगोला तालुकामहाराष्ट्रराजकीय

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची हकालपट्टी करावी.; शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

सांगोला:- भारतीय घटनेचा व लोकशाहीचा हत्येचा प्रयत्न करणारे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना तात्काळ पदावरून हकालपट्टी करावी अशी मागणी सांगोला तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून तहसीलदार यांचेकडे निवेदनाद्वारे गुरुवार दिनांक 11 जानेवारी रोजी करण्यात आली.
सर्वोच्च न्यायालय व भारतीय घटनेची पायमल्ली करणारे या महाराष्ट्राचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राजकीय पेचाबद्दल जो निकाल दिला तो निकाल म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचा अपमान व भारतीय घटना / लोकशाही धोक्यात आणणारा निकाल दिलेला आहे. म्हणुन लोकशाही धोक्यात आणणार्‍या व लोकशाहीची पायमल्ली करणार्‍या राहुल नार्वेकर यांना तात्काळ पदावरून हटवावे व त्यांनी महाराष्ट्राच्या राजकीय पेचाबद्दल जो निकाल दिला तो निकाल म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचा व भारतीय घटनेचा अपमान करणारा निकाल दिला आहे. म्हणुन अशा विधानसभा अध्यक्षाचा सांगोला शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून राहुल नार्वेकर यांचा  निषेध करण्यात येत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
निवेदन देते प्रसंगी उपजिल्हाप्रमुख सूर्यकांत घाडगे, तालुकाप्रमुख अरविंद पाटील, तालुका संघटक हरिभाऊ पाटील, विधानसभा अध्यक्ष कमरुद्दीन खतीब, शहर प्रमुख तुषार इंगळे, शहर संघटक आगतराव वाघमोडे, उपतालुकाप्रमुख गोरख यजगर, युवा सेना शहरप्रमुख सौरभ चव्हाण, अनिल बेहेरे, बाबासाहेब आयवळे, रघुनाथ आयवळे, संदीप जगताप, समाधान चव्हाण, चंदन जाधव, सुधीर आहेरकर, संतोष खडतरे, सचिन पाटील, सलीम मुलाणी, शिवाजी चौगुले,  अण्णा बंडगर, सुरेश व्हनमाने, अण्णा बंडगर, रघुनाथ एवळे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!