शैक्षणिकसांगोला तालुका

नाझरा विद्यामंदिरच्या दोन विद्यार्थिनी शिष्यवृत्ती परीक्षेत राज्याच्या गुणवत्ता यादीत

नऊ विद्यार्थी जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत चमकले

नाझरा(वार्ताहर):- शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये घेण्यात आलेल्या पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत नाझरा विद्यामंदिरने घवघवीत यश संपादन करत शिष्यवृत्तीच्या परीक्षेतील उज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे. राष्ट्रीय ग्रामीण विभागातून 274 गुण मिळवून ऋतुजा दिगंबर शिंगाडे हिने आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात तिसरा व जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला. त्याचबरोबर आरती सचिन बनसोडे या विद्यार्थिनीने 260 गुण मिळवत राज्यात दहावा व जिल्ह्यात पाचवा क्रमांक पटकावला. इयत्ता आठवी मधील जिल्हा गुणवत्ता यादीत चमकलेले विद्यार्थी पुढील प्रमाणे- मोहिते संजीवा गजानन 248 गुण जिल्ह्यात सहावा, बुलबुले सृष्टी संजय 226 गुण जिल्ह्यात 45 वी, बाबर शंतनु जगन्नाथ 220 गुण जिल्ह्यात 59 वा, डोंगरे अनुष्का नवनाथ 214 गुण जिल्ह्यात 83 वी, सरगर युवराज आत्माराम 208 गुण जिल्ह्यात 123 वा, निंबाळकर हर्षवर्धन दादासाहेब 206 गुण जिल्ह्यात 139 वा, काझी अब्दुल कय्युम सय्यद फिरोज 184 गुण अल्पसंख्यांक मधून जिल्ह्यात दुसरा, सदर विद्यार्थ्यांना विभाग प्रमुख वसंत गोडसे,दिलीप सरगर, संभाजी सरगर व मंजुश्री ओतारी यांचे मार्गदर्शन लाभले.इयत्ता पाचवी मधून आदर्श संजीव बाबर या विद्यार्थ्याने 250 गुण मिळवत जिल्ह्यात 107 वा क्रमांक पटकावला तर अलफाज फारुख काझी या विद्यार्थ्याने 238 गुण मिळवत जिल्ह्यात 204 वा क्रमांक पटकावला. सदर विद्यार्थ्यांना इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती विभाग प्रमुख सुनील जवंजाळ,मारुती सरगर, महालिंग पाटील,दीप्ती काशीद यांचे मार्गदर्शन लाभले.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रबुद्धचंद्र झपके, संस्थासचिव मल्लिकार्जुन घोंगडे,सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके, संस्था कार्यकारणी सदस्य विश्वेश झपके, प्राचार्य अमोल गायकवाड, पर्यवेक्षक मधुकर धायगुडे, संस्था बाह्य परीक्षा विभाग प्रमुख शिवाजी चौगुले,प्रशाला बाह्य परीक्षा विभागप्रमुख महालिंग पाटील व सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी पालक यांनी अभिनंदन केले.

फोटो पाठवत आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!