सांगोला तालुका

सांगोला विद्यामंदिरच्या  माजी विद्यार्थिनी सौ.माधुरी नकाते (यादव) यांनी लग्नानंतर मिळवली CA पदवी*

सांगोला ( प्रतिनिधी ) सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज सांगोला माजी विद्यार्थिनी  सौ.माधुरी नकाते (यादव) या कै. विलास रामचंद्र यादव, रा.(कोपटे वस्ती) सांगोला यांची कन्या आहेत. सांगोला विद्यामंदिरमधील माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणानंतर सन २०१६ मध्ये त्यांनी बी.ई.संगणक ही पदवी प्राप्त केली. सन २०१६ मध्येच त्यांचा विवाह अकोला (वासुद) , तालुका सांगोला येथील आरटीओ इन्स्पेक्टर संजय शिवाजी नकाते यांचे बरोबर झाला. विवाहानंतर सन २०२० पासून त्यांनी सनदी अधिकारी बनण्याचे स्वप्न बाळगले.सध्याच्या धावपळीच्या काळात  कौटुंबिक जबाबदार्‍या पार पाडून स्पर्धात्मक अभ्यासक्रम पूर्ण करणे हे अत्यंत जिकिरीचे असते तरी त्यातून,घर व तीन वर्षाची लहान मुलगी सांभाळून CA सारखी कठीण परीक्षा उत्तीर्ण करून यश प्राप्त केले तरी त्यामुळे त्यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
इंजिनियरिंग पदवी प्राप्त केल्यानंतर कोणतेही कॉमर्स चे बॅकग्राऊंड नसतानाही त्यांनी कॉमर्स मध्ये आवड निर्माण केली. त्यांनी हे यश मिळवून शास्त्र शाखेतील विद्यार्थ्यांपुढे एक आदर्श निर्माण केला आहे.तसेच यामुळे त्यांना समाज उपयोगी कामामधे हातभार लावण्याची सुवर्ण संधी मिळणार आहे.हे यश मिळविण्यासाठी आई, वडील, सासू,  सासरे, भाऊ, पती, मामा, आजी व आजोबा यांचे मार्गदर्शन मिळाले.  या यशासाठी सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन होत आहे..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!