sangolacrimemaharashtra
भरधाव पिकअपची कमानीस धडक…. पिकअप चालकाचा गंभीर जखमी होऊन मृत्यू*
सांगोला (तालुका प्रतिनिधी) दूधडेअरी वर गोळा केलेले दूध सांगोला येथे पोहोचवून परत निघालेल्या पिकअप चालकाने सावे ता.सांगोला येथील कमानीला जोराची धडक दिल्याने पिकअप चालकाचा गंभीर जखमी होऊन उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याची घटना बुधवार दि.१० जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास सावे ता. सांगोला येथे घडली आहे.देवीदास दत्तात्रय भोसले वय ३२ रा. लक्ष्मी दहिवडी ता. मंगळवेढा असे अपघातात मरण पावलेल्या पिकअप चालकाचे नाव होय.
पिकअपचा चालक देवीदास दत्तात्रय भोसले रा. लक्ष्मी दहिवडी ता. मंगळवेढा हा बुधवार दि.१० रोजी सकाळी दहा वाजन्याच्या सुमारास लक्ष्मी दूध डेअरी लक्ष्मी दहिवडी येथून दूधाचे कॅन्ड पिकअपमध्ये घेवून सांगोला येथील गोकूळ दूधडेअरी येथे दूध घालून परत ११ वा . च्या सुमारास गावाकडे लक्ष्मीदहिवडी येथे निघाला असताना सावे ता.सांगोला गावातील कमानीला दारूचे नशेत घरधाव वेगात पिकअप चालवून कमानीला जोराची धडक दिली असता या अपघातात देविदास भोसले हा गंभीर जखमी झाल्याने तो जागेवरच बेशुद्ध पडला होता त्यास उपचाराकरिता सांगोला येथील ग्रामीण रूग्नालय येथे आणले असता डॉक्टरांनी देविदास भोसले हा उपचारापुर्वीच मयत असल्याचे सांगितले याबाबत राजकुमार सिध्देश्वर बर्गे रा. लक्ष्मी दहिवडी यांनी चालक देविदास भोसले याने त्याच्या ताब्यातील पिक अप दारूचे नशेत व निष्काळजीपणाने चालवून स्वताच्या मरणास तसेच पिकअपचे ५० हजार रुपये किमतीचे नुकसान करण्यास कारणीभूत ठरल्या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.