अभिनव पब्लिक स्कूलच्या नऊ खेळाडूंची राज्यस्तरीय बाल मैदानी स्पर्धेसाठी निवड**

रविवार दि. ७ जानेवारी २०२४ रोजी सोलापूर जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने घेण्यात आलेल्या जिल्हा बाल मैदानी स्पर्धेत अभिनव पब्लिक स्कूल अजनाळे च्या विद्यार्थ्यांनी चार सुवर्णपदक, पाच रौप्य पदक आणि तीन कांस्यपदक पटकावित घवघवीत यश संपादन केले.
यामध्ये हर्षिता संदीप कोळवले-लांब उडी प्रथम क्रमांक (८ वर्षे वयोगट) आर्यन सचिन विभुते- लांब उडी प्रथम क्रमांक (१०वर्ष वयोगट) आर्या अजित चव्हाण- लांब उडी प्रथम क्रमांक तसेच गोळा फेक प्रथम क्रमांक (१० वर्षे वयोगट )श्रावणी चंद्रकांत लाडे -लांब उडी द्वितीय क्रमांक (८ वर्षे वयोगट )स्वराज सत्यवान पवार -लांब उडी द्वितीय क्रमांक तसेच 60 मीटर धावणे द्वितीय क्रमांक (१० वर्षे वयोगट )अनुष्का गणेश येलपले -लांब उडी द्वितीय क्रमांक(१० वर्षे वयोगट ) सुहानी रमेश चोरमले- लांब उडी द्वितीय क्रमांक तसेच 300 मीटर धावणे तृतीय क्रमांक(१२ वर्षे वयोगट )स्वराली रोहित बनकर- लांब उडी तृतीय क्रमांक (८ वर्षे वयोगट )अनन्या जगन लाडे -लांब उडी तृतीय क्रमांक (१०वर्षे वयोगट) आदी खेळाडूंनी आपल्या दमदार कामगिरीच्या जोरावर हे यश संपादन केले. सदर खेळाडूंची निवड सांगली येथे होणाऱ्या राज्य बाल मैदानी ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी झाली आहे. या विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक विशाल पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.सर्व यशस्वी खेळाडूंचे संस्थाध्यक्ष शिवाजी लाडे सर व मुख्याध्यापिका कावेरी गिड्डे यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सर्व यशस्वी खेळाडूंचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालक यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.