सांगोला तालुका

रोटरीच्या नक्षत्र कॉन्फरन्समध्ये सांगोल्याचा उस्फूर्त सहभाग..

दि. 6 ते 8 जाने.24 मध्ये लोणावळा खंडाळा येथील आंबे व्हॅली या ठिकाणी  रोटरी 3132 ची कॉन्फरन्स पार पडली, त्यामध्ये सांगोल्यातील 22 सदस्यांनी मनापासून आनंद घेतला, रोटरीबरोबरचे नाते नव्याने घट्ट केले आणि ही कॉन्फरन्स यशस्वी केली.
 कॉन्फरन्स मध्ये रोटरी इंटरनॅशनल च्या अध्यक्षांचे प्रतिनिधी माजी प्रांतपाल वीरपी होनकला, माजी प्रांतपाल मॅटी होनकला, माजी रोटरी इंटरनॅशनल अध्यक्ष कल्याण बॅनर्जी, माजी रोटरी इंटरनॅशनल डायरेक्टर डॉ.महेश कोठबागी, व कमाल संघवी. माजी प्रांतपाल डॉ.मीना पटेल इ. रोटरी इंटरनॅशनलचे प्रतिनिधित्व मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
मा.उदय निरगुडकर, ले. जनरल विनायक पाटणकर, मॅगसेसे पुरस्कार प्राप्त राजेंद्र सिंह, हॅरोल्ड डिकोस्टा, मयांक गांधी या दिग्गजांनी विविध विषयांवर वैशिष्ठ्यपूर्ण मार्गदर्शन केले. पाणी आडवा पाणी जिरवा व पर्यावरण रक्षण असे सर्वांच्या जिव्हाळ्याचे विषय होते त्यामुळे
ही कॉन्फरन्स दिमाखदार झाली.
रोटरी क्लब ऑफ वाई यांनी होस्ट केलेल्या या कॉन्फरन्सने अनेक नवे ट्रेंड सेट केले. सर्वांचा आनंद, जोश आणि सहभाग यामुळेच ही कॉन्फरन्स अधिक देखणी होवू शकली असल्याचे रो.अध्यक्ष डॉ. साजिकराव पाटील यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!