वन विभाग तरुणांना नोकरी बरोबरच समाजसेवेचे संधी देणारे क्षेत्र श्री माणिक भोसले
सांगोला/प्रतिनिधी:
महाराष्ट्र हे नैसर्गिक दृष्ट्या भारतातील एक समृद्ध घटक राज्य आहे. त्यामुळे महाराष्ट्रात
वने व जंगले वैविध्यपूर्ण आहेत. या जंगल व वनांच्या संवर्धनासाठी महाराष्ट्रात वन विभाग
प्रभावीपणे कार्यात असलेला दिसतो. या वनविभागाने राज्यातील तरुणांना नोकरी बरोबरच
समाजसेवेची फार मोठे क्षेत्र खुले केले आहे असे प्रतिपादन सांगोला तालुक्याचे सुपुत्र व भारतीय वन
सेवेतील सेवानिवृत्त अधिकारी श्री माणिक भोसले यांनी केले.
सांगोला महाविद्यालयातील स्पर्धा परीक्षा, करिअर समुपदेश, मार्गदर्शन कक्ष, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने दि
12 जानेवारी 2024 रोजी मार्गदर्शनपर व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी
व्यासपीठावर सांगोला तालुका उच्च शिक्षण मंडळाचे सचिव श्री. म.सि. झिरपे, सदस्य श्री. सुरेश
फुले, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सुरेश भोसले व समन्वयक डॉ. जमीर तांबोळी हे
उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते म्हणून मार्गदर्शन करताना श्री. माणिक भोसले यांनी
महाराष्ट्रातील जैवविविधता, नैसर्गिक साधन संपत्ती, वन विभागामार्फत केली जाणारी कार्ये,
वन्यजीवन व स्पर्धा परीक्षाव्दारे वनविभागात भरल्या जाणाऱ्या पदाविषयी विस्तृत माहिती दिली.
त्याचबरोबर संस्थेचे सचिव श्री. म. सि. झिरपे यांनी स्पर्धा परीक्षेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी
सहभाग घ्यावा असे आवाहन केले. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष या नात्याने महाविद्यालयाचे प्रभारी
प्राचार्य डॉ.सुरेश भोसले यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना स्पर्धा परीक्षांचा इतिहास,
भारतातील स्पर्धा परीक्षा व तरुणांना स्पर्धा परीक्षा द्वारे उपलब्ध होणारा रोजगार याविषयी विस्तृत
विवेचन केले.
या कार्यक्रमाचे प्रस्ताविक स्पर्धा परीक्षा करिअर समुपदेशन व मार्गदर्शन कक्षाचे समन्वय प्रा.डॉ.
जमीर तांबोळी यांनी केले. तर प्रमुख वक्ते व उपस्थिततांचा परिचय प्रा.डॉ रेणुकाचार्य खानापुरे यांनी करून
दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगणक विभागातील प्रा. विशाल कुलकर्णी यांनी केले. तर उपस्थितांचे आभार
प्रा. अनिस बागवान यांनी मानले. यावेळी अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षातील समन्वयक व सदस्य, विविध
विषयाचे सहकारी प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.