सांगोला तालुका

अभिनव पब्लिक स्कूल मध्ये हळदीकुंकू कार्यक्रम उत्साहात संपन्न **

 अभिनव पब्लिक स्कूल अजनाळे येथे मकर संक्रांतीनिमित्त हळदी कुंकू कार्यक्रम शनिवार दिनांक 20 जानेवारी 2024 रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका कावेरी गिड्डे या होत्या. अजनाळे गावच्या सरपंच सुभद्रा कोळवले या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लाभल्या. मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. प्रस्तावनेत सहशिक्षिका वंदना शिंदे यांनी मकर संक्रांति व हळदीकुंकू चे महत्व माता पालकांना सांगितले. मुख्याध्यापिका गिड्डे यांनी उपस्थित माता पालकांशी विद्यार्थ्यांच्या प्रगती बाबत चर्चा केली यावर माता पालकांनी आपल्या पाल्याच्या प्रगती बाबत समाधान व्यक्त करत संपूर्ण अभिनव टीमचे कौतुक केले. यामध्ये दिपाली बदडे, अश्विनी बनकर, विश्रांती पुजारी, रुणाली कोळवले यांनी अभिनव स्कूलचे  विशेष कौतुक केले.यानंतर हळदीकुंकू कार्यक्रम घेण्यात आला व सर्व माता पालकांना तिळगुळ व वाण देण्यात आला. हळदी कुंकू कार्यक्रमाच्या निमित्ताने इयत्ता पाचवी ते नववी विद्यार्थ्यांच्या रांगोळी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. सुंदर रांगोळ्या पाहून सर्वांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
 चहापानानंतर सर्व माता पालकांसाठी महत्त्वाचे आकर्षण असलेल्या फनी गेम्स चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये संगीत खुर्ची व तळ्यात मळ्यात या स्पर्धा घेण्यात आल्या. संगीत खुर्ची या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरलेल्या सुजाता  कोळवले यांना मानाची पैठणी देऊन सन्मानित करण्यात आले. द्वितीय क्रमांक पटकावलेल्या राणी लोकरे व तृतीय क्रमांकाच्या मानकरी भाग्यश्री पाटील यांना आकर्षक भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. त्याचबरोबर तळ्यात मळ्यात या स्पर्धेच्या प्रथम क्रमांकाच्या विजेत्या सिंधू कोळेकर यांनाही मानाची पैठणी देऊन सन्मानित करण्यात आले . द्वितीय क्रमांकाच्या मानकरी प्रियांका येलपले व तृतीय क्रमांक विजेत्या मोनिका  येलपले यांनाही आकर्षक भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. सदर प्रथम क्रमांकाच्या पैठणीसाठी संदीप कुरे व हणमंत करडे यांचे सौजन्य लाभले. या कार्यक्रमासाठी माता पालकांचा खूप मोठ्या  प्रमाणात प्रतिसाद मिळाला. अभिनवच्या अशा वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल सर्वच माता पालकांनी स्कूलचे  खूप कौतुक केले तसेच सर्व शिक्षकांचे विशेष अभिनंदनही केले. उद्बोधन पर मार्गदर्शन करत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सीमा कदम यांनी केले तर आभार पूजा शेळके यांनी व्यक्त केले. संपूर्ण कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!