राजकीयमहाराष्ट्रसांगोला तालुका

सांगोल्याचा विकास कसा होईल हे बघण्याचे काम डॉ.अनिकेत देशमुख तुम्ही करायचे आहे.  अनिकेतचे काम पाहून मी आज खरोखरच प्रभावित – शेकाप चिटणीस भाई.जयंत पाटील

भाई.जयंत पाटील यांचेकडून  डॉ.अनिकेत देशमुख यांना शाब्बासकी थाप

सांगोला(प्रतिनिधी):-सांगोल्यात जे पाणी आणले आहे त्याची सुरुवात  पवार साहेबांनी केली आहे.  सांगोल्याची जनता स्व.आबासाहेबांचे नाव कधापीही विसरु शकणार नाही परंतु उद्याचा सांगोला हा वेगळा असेल.सांगोला सुजलाम सुफलाम दिसून येईल. खास बाब म्हणून शेतीवर प्रक्रिया असणारे उद्योग पुढे मागे आपणाला सुरु करावे लागतील. त्यासाठी आपण प्रयत्नशील राहूया, मी स्वत: तर प्रयत्न करणार आहे. भक्कमरित्या आधुनिक शेतीतून सांगोल्याचा विकास कसा होईल हे बघण्याचे काम डॉ.अनिकेत देशमुख तुम्ही करायचे आहे. तुमच्याकडून वेगळ्या अपेक्षा आमच्या आहेत. याठिकाणी ज्यापध्दतीचे काम सध्या तुम्ही करताय ते बघून मी खरोखरच प्रभावित झालो आहे अशी शाब्बासकीची थाप शेकाप चिटणीस जयंत पाटील यांनी डॉक्टर अनिकेत देशमुख यांना दिली.
सांगोला येथे शुकवार दि.19 जानेवारी रोजी डॉ.अनिकेत देशमुख यांच्या संकल्पनेतून गणेशरत्न कृषीप्रदर्शन आयोजीत करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर देशाचे माजी कृषीमंत्री शरदचंद्रजी पवार, श्रीमती. रतनबाई गणपतराव देशमुख, चेअरमन अभिजीतआबा पाटील,शिवसेनेचे प्रवक्ते प्रा.लक्ष्मण हाके, उत्तमराव जानकर, बळीराम साठे, गणेश पाटील,  प्रविण गायकवाड, राम साळे, बाबुराव गायकवाड, तानाजीकाका पाटील, कृषीभूषण प्रभाकर चांदणे, नागेश फाटे, चंद्रकांतदादा देशमुख, डॉ.बाबासाहेब देशमुख, सुवर्णा शिवपुरे, सौ.सुरेखाताई देशमुख, सौ.जयमालाताई गायकवाड,  मोहन गुंड, उद्योगपती बाळासाहेब एरंडे, मारुतीआबा बनकर, डॉ.प्रभाकर माळी, इंजि.रमेश जाधव, अ‍ॅड.सचिन देशमुख, बाळासाहेब काटकर, अ‍ॅड.मारुती ढाळे, डॉ.पियुष साळुंखे-पाटील  यांच्यासह जिल्ह्यातील नेतेमंडळी, शेतकरी बांधव, महिला, शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी शेकापचे सरचिटणीस भाई.जयंत पाटील बोलत होते.
यावेळी पुढे बोलताना आ.भाई.जयंत पाटील म्हणाले, संविधान, घटना कायम राहिली पाहिजे. ही भूमिका घेऊन वेगवेगळे पक्ष एकत्र आले आहेत. घटना संविधान बदलायला मागतायेत त्याचा पुरेपुर विरोध केला पाहिजे. महाराष्ट्र टर्निंग पाईंट आहे. महाराष्ट्र निर्णायक आहे. कोणी कितीही बोला 45 जागा कशाला 50 जागा घ्या आणि अजुन 2 चंद्रावरुन आणा असा विरोधकांना टोला लगावत येणार्‍या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी आणि इंडियालाच यश मिळणार असून सर्वांनी एकदिलाने काम करा.सांगोल्याचे भविष्य उज्जवल आहे. चुकाही  झाल्या, खूप वेळा टीकाही झाली. परंतू पवार साहेबांची साथ आम्ही कधीही सोडली नाही. पवार साहेबांनी सांगिल्यानंतर नुकसान झाले तरी आमच्या कुटुंबाने पवार साहेबांचा शब्द खाली पडू दिला नाही. पवार साहेब हेच खरे जनतेचे कष्टकर्‍यांचे आणि शेतकर्‍यांचे नेते आहेत. मीही पवार साहेबांचा शिष्य आहे. जनतेमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये पवार साहेब आणि उध्दव साहेब यांची  साद होती. परिवर्तन 100 टक्के होणार असून  जनता राजकारणातून हद्दपार करेल. हे काम आपणास पहिल्यांदा करावे लागेल. इंडिया आघाडीव्दारे सर्वांना घेऊन काम करायचे. याठिकाणी महाराष्ट्रात  चांगले परिवर्तन होईल. आज पवार साहेब तुमची खरी गरज आहे. शेती व्यवसाय कसा वाढेल यासाठी तुमच्यासारखे नेते पाहिजेत. पवार साहेब निवडणुक लढविणार नाही असे म्हणून नका. तुमची पार्लमेंटमध्ये गरज आहे. आबासाहेब जसे शेवट पर्यंत राहिले तसे तुम्ही ही राहिले पाहिजे अशी विनंतीही त्यांनी शेवटी केली.
पवार साहेबांचे नेटवर्क आणि व्यक्तीगत संबंध आहेत ते पक्षाच्या आणि विचाराच्या पलीकडे आहेत.  कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनाला  कार्यक्रमाला पवार साहेबांशिवाय लायक माणूस नाही . त्यांच्या हस्ते उद्घाटन झाले त्यासाठी डॉ.अनिकेत देशमुख यांचे आभार मानत सांगोल्याची जनता पवार साहेबांना कधीही विसरणार नाही. पवार साहेबांचा सध्याचा कठीण काळ आहे. त्यांचा पुढचा काळ उज्वल आहे. त्यांचे आयुष्य पण वाढणार आहे. आमच्या सारखे तरुण कार्यकर्ते, विविध विचारांचे लोक एकत्रित करण्याचे काम इंडिया आघाडीच्या निमित्ताने पवार साहेबांनी केले. त्यांच्या आग्रहामुळे मी आज इंडिया आघाडीच्या कमिटीमध्ये आहे.  कमिटीमध्ये काम करताना पवार साहेब व उध्दव ठाकरे यांचा जो दबदबा आहे व तो पाहून मला अभिमान वाटतो. देशाच्या राजकारणात प्रभावशाली म्हणून पवार साहेबांना व उध्दव ठाकरे यांना काम करताना मी बघतोय.
सांगोला आबासाहेबांचा, सांगोला पवार साहेबांचा हे आपणास यापुढे दाखवून द्यायचे आहे. पवार साहेब तुम्ही आमच्या लोकांना सोडू नका, आम्ही आयुष्यभर तुमच्या सोबत राहणार आहोत हे लक्षात ठेवा. आबासाहेबांचे नातू दोन्ही डॉ.बंधू हे राम लक्ष्मणाची जोडी, सांगोल्याच्या आबासाहेबांपेक्षा जास्त परिवर्तन, आधुनिक करेल अशी अपेक्षा व्यक्त करत दोघांचे वेगळे काम असून डॉक्टर अनिकेत, डॉक्टर बाबासाहेब हे दोघे सातत्याने माझ्या संपर्कात आहेत. सांगोल्यात माझ्या शब्दांचे बाहेर कोणी जाणार नाही हा माझा विश्वास व खात्री आहे. त्यामुळे कोणीही चर्चा करायची नाही.  दोघे डॉक्टर बंधू  राम-लक्ष्मण या भावाप्रमाणे  दत्ता पाटील व प्रभाकर पाटील यांच्या पेक्षाही मोठे व्हाल अशी अपेक्षा व्यक्त करत कष्टकरी, गोरगरीब, वंचित गोरगरीबाचें, वंचिताचे विचार टिकवून ठेवण्याचे काम सांगोल्याने केले. सांगोला हे डावी आघाडीच, डव्या विचाराचे व्यासपीठ आहे. याठिकाणी आम्ही गणपतराव आणि एन.डी.पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही शिकलो, ती भूमी अजुन कशी तेजस्वी होईल हे बघण्याचे काम नवीन पिढीने करावे असे शेवटी त्यांनी सांगितले.
चौकट:-कृषी प्रदर्शन व्यापक करा, कृषी प्रदर्शनामध्ये सातत्य ठेवले पाहिजे. याठिकाणचे तरुण शेती व्यवसायात कसे आकर्षित होतील याचे काम यापुढे डॉ.अनिकेत तुम्ही केले पाहिजे असे आग्रह करत अनिकेत देशमुख स्वत: डॉक्टर आहेत. डॉ.बाबासाहेब शांत आहेत, अनिकेत  हा चपळ आहे. आणि मला अनिकेत आवडतो. काल पासून मी सांगोल्यात आहे. हे दोघे डॉक्टर जरी असले तरी  मी कंपाऊडर आहे. यांना ठीक करण्याचे काम मी कधीपण करु शकतो. सांगोल्यात माझ्या शब्दांचे बाहेर कोणी जाणार नाही हा माझा विश्वास व खात्री आहे. त्यामुळे कोणीही काहीही चर्चा करायची नाही. दोघेहि डॉक्टर बंधू  राम-लक्ष्मण भाऊ  दत्ता पाटील व प्रभाकर पाटील याच्यापेक्षाही मोठे व्हाल.
भाई.जयंत पाटील, सरचिटणीस, शेकाप

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!