महाराष्ट्र

सांगोला महाविद्यालयामध्ये आय.आय.टी. ला प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकाचा सत्कार

सांगोला / प्रतिनिधी : सांगोला महाविद्यालयामध्ये आय.आय.टी.(गुजरात) येथे प्रवेश मिळालेल्या विद्यार्थी विराज सुरेश गाडेकर याचे वडील श्री. सुरेश तुकाराम गाडेकर यांचा सत्कार करण्यात आला.

श्री. सुरेश तुकाराम गाडेकर यांनी सांगोला महाविद्यालयातून बी.सी.एस. व एम.एस्सी. संगणकशास्त्राची पदवी प्राप्त केली आहे. ते महाविदयालयाचे माजी विद्यार्थी असून त्यांच्या पाल्याने  नुकतेच आय.आय.टी. JEE Advance AIR अखिल भारतीय तंत्रशिक्षण गुणवत्ता यादीमध्ये 1897 नंबरवर आहे. Jee Mains परीक्षेत 99.63% गुण मिळाले आहेत. विराज गाडेकर सध्या गुजरात येथे शिक्षण आहे. त्याच्या या मिळालेल्या यशाबद्दल संस्थेचे माजी सेक्रेटरी मा. म.सि.झिरपे सर, संस्था कार्यकारणी निमंत्रित सदस्य मा. सुरेश फुले, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रो.डॉ.सुरेश भोसले, महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षिकेत्तर कर्मचारी यांनी त्यांचा सत्कार केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button