सांगोला तालुका

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचाराचा वारसा पुढे चालवूया- उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील; शिवजयंतीनिमित्त सांगोला येथे शांतता कमिटीची बैठक संपन्न

सांगोला (प्रतिनिधी):शिवजयंती साजरी करत असताना सर्वांनी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. सांगोला तालुका आता मेडिकल हब बनत चालला असल्यामुळे सर्वांनी आवाजाच्या मर्यादा पाळा. रॅलीचा मार्ग निवडला आहे त्या मार्गावरूनच रॅली काढणे गरजेचे आहे.शिवजयंती उत्सव कालावधीत कोणत्याही जाती धर्माचा अपमान होणार नाही यासाठी सर्वांनी प्रयत्न करून छत्रपती शिवाजी महाराज यांचा विचाराचा वारसा पुढे चालवूया असे आवाहन करत शिवजयंती उत्सव सोहळा शांततेत आणि चांगल्या पद्धतीत उत्सव साजरा करूया असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांनी केले.
आगामी शिवजयंतीनिमित्त काल मंगळवार दि.14/2/2023 रोजी सकाळी 11/00 वा बचत भवन हॉल,पंचायत समिती सागोला येथे बैठक आयोजित करण्यात आली होती.यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील बोलत होत्या.व्यासपीठावर पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी, मुख्याधिकारी सुधीर गवळी, वीज वितरण विभागाचे आनंद पवार, सहा.पोलीस निरीक्षक नागेश यमगर उपस्थित होते.
यावेळी राजश्री पाटील यांनी शिवजयंती कालावधीत तालुक्यातील पोलिस पाटील गाव सोडून बाहेर जाणार नाही, सर्वांना चोख काम करावे लागेल असे सांगत वेळोवेळी दिलेल्या सुचनाचे पालन करावे लागेल.अशा सूचना यावेळी त्यांनी उपस्थित पोलीस पाटील यांना दिल्या.
यावेळी श्री.बाबुराव गायकवाड म्हणाले, जयंतीचा आनंद सर्वांनी साजरा करा परंतु आपल्यामुळे दुसर्‍यांना त्रास होणार नाही यांची सर्वांनी काळजी घ्यावी. जयंती साजरी करताना आपल्या सर्वांची जबाबदारी महत्वाची आहे प्रशासनावर ताण देऊ नका. महापुरुषांच्या वाटण्या करु नका असे आवाहन करत अतिक्रमण व लाईट संदर्भात असणारे विषय संबंधीत प्रशासनाने त्वरीत सोडवावेत, असे सांगितले.
श्री.अरविंद केदार म्हणले, सर्व जणांना सोबत घेऊन आम्ही शिवजयंती साजरी करणार आहोत. जयंती उत्सवामध्ये सर्वाचा सन्मान करणार आहोत. शिवजयंती साजरी करताना सर्वजणांना एक दिलाने काम करावे लागणार आहे. प्रत्येकाने आपआपले योगदान देऊन शिवजयंती उत्साहात साजरी करूया. त्याप्रमाणे शिवजयंती मंडळास लाईट नाही दिली तरी चालेल पण शेतकरी बांधवांची लाईट तोडू नका, आम्ही जनरेटर लावून जयंती साजरी करू असे सांगितले.
श्री. किशोर बनसोडे म्हणाले,जाती जातीचे अंतर कमी करून प्रेम वाढवूया, प्रशासनाला सहकार्य करत जयंती साजरी करूया असे आवाहन केले.
श्री.सुभाष इंगोले म्हणाले, गेली दोन वर्षे शिवजयंती साजरी करताना बर्‍याच अडचणी आल्या.परंतु या वर्षी जयंती उत्सहाता साजरी करूया पण प्रशासनावर ताण येणार नाही यांची सर्वांनी काळजी घेऊया असे सांगितले.
प्रा.संजय देशमुख म्हणाले, शिवजयंतीमध्ये वाद उपस्थित होणार नाही यांची सर्वानी काळजी घ्यावी, 19 फेब्रुवारी रोजी शहरात एकच रॅली निघणार आहे. कोणीवेगळे संदेश पसरवू नका असे सांगत चांगल्या पद्धतीने जयंती साजरी करूया असे सांगितले.
यावेळी रवींद्र कांबळे म्हणाले, शिवजन्मोत्सवामध्ये सर्व जातीधर्मातील लोक एकत्र येतात त्यामुळे अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी आपण सर्वांनी दक्ष राहिले पाहिजे असे सांगितले. यावेळी डॉ.पियूष साळुंखे पाटील यांनी चालू वर्षीच्या कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार सहा.पोलीस निरीक्षक नागेश यमगर यांनी व्यक्त केले. बैठकीस कमरूद्दीन खतिब, योगेश खटकाळे, गुंडादादा खटकाळे,प्रताप इंगोले, महेश नलवडे, बबलू इंगोले, यांच्यासह पोलीस पाटील, तालुक्यातील शिवसैनिक, विविध मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

शिवजयंती उत्सवासाठी सांगोला पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी कर्मचारी सज्ज असून शिवजयंती उत्सवामध्ये गालबोट लागणार नाही याची काळजी घ्यावी. डॉल्बीचा आवाज मर्यादित असणे गरजेचे देखावे आक्षेपार्ह नसावे. शिवजयंती कालावधीत सर्वांनी नियमांचे पालन करणे गरजेचे असून कायदा मोडणार्‍यांवर कारवाई करण्यात येणार आहे.
श्री.अनंत कुलकर्णी, पोलीस निरीक्षक, सांगोला

सांगोला नगरपरिषदेच्यावतीने शिवजयंतीनिमित्त आम्ही वृक्षारोपणाचा भव्य कार्यक्रम घेणार आहेत. शिवजयंती दिवशी रविवार असल्यामुळे छोट्या मोठ्या व्यापारी बांधवांना रॅलीस अडथळा होणार नाही याबाबत गेल्या काही दिवसापासून सूचना देण्यात येत आहेत. त्यामुळे रॅली मार्गात अडथळा येणार नाही याची दक्षता घेऊन ज्याठिकाणी खड्डे आहेत त्याठिकाणी त्वरीत दुरुस्ती केली जाणार आहे. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुर्णाकृती पुतळ्यासंदर्भात जी काही मदत लागेल ती त्वरीत करणार आहे.
सुधीर गवळी, मुख्याधिकारी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!