प्रथमेश बाबर यांची सोलापूर जिल्ह्यात तिसऱ्या क्रमांकाने तलाठी पदी निवड

शिरभावी शाळेतील ज्येष्ठ आदर्श शिक्षक श्री दत्तात्रय कुंडलिक बाबर यांचे सुपुत्र श्री प्रथमेश दत्तात्रय बाबर यांचे नुकत्याच झालेल्या तलाठी परीक्षेत सोलापूर जिल्ह्यातून सर्वसाधारण गुणवत्ता यादीत दोनशे पैकी 198 गुण प्राप्त करून तिसऱ्या क्रमांकावर तलाठी पदी निवड झाली.
प्रथमेश चे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पुजारवाडी येथे माध्यमिक शिक्षण विद्यामंदिर प्रशाला सांगोला व उच्च माध्यमिक शिक्षण सोलापूर येथे झाले बीएससी ऍग्री ही पदवी प्रथम श्रेणीतून राजश्री छत्रपती शाहू महाराज शासकीय कृषी महाविद्यालय कोल्हापूर येथून प्राप्त केली पदवी प्राप्त केल्यानंतर स्पर्धा परीक्षेची तयारी पुणे व सांगोला येथे केली प्रथमेश हा लहानपणापासूनच जिद्दी चिकाटी व प्रयत्नावादी होता शालेय जीवनापासूनच चौथी शिष्यवृत्ती सातवी शिष्यवृत्ती व इतर स्पर्धा परीक्षेत उज्वल हे संपादन केले होते नुकत्याच झालेल्या राज्यसेवा परीक्षेची मुख्य परीक्षा ही दिली आहे प्रशासकीय सेवेत उच्च पदी निवड होण्यासाठी तो अभ्यास करत असून त्यातही लवकरच त्याला यश मिळेल.प्रथमेशने मिळवलेल्या या यशाबद्दल त्याचे व पालक यांचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक होत आहे