मर्जीना इनामदार हिची तलाठी पदावर निवड झाल्याबद्दल कुलकर्णी परिवारातर्फे सत्कार संपन्न.

जवळे (प्रशांत चव्हाण) जवळे गावची सुकन्या मर्जीना साहेबहुसेन(राजू) इनामदार हिची तलाठी पदावर सोलापूर जिल्ह्यात निवड झाली.त्याबद्दल मर्जीना इनामदार हिचा सत्कार श्री.डी वाय कुलकर्णी परिवारातर्फे श्रीमती सुनंदा कुलकर्णी मॅडम यांच्या शुभहस्ते करण्यात आला
याप्रसंगी श्री.प्रकाश गोरे, श्री.रावसाहेब मोहिते,श्री.भीमराव गावडे सौ.सीता सुरवसे आदी उपस्थित होते.
सोलापूर जिल्ह्यात 197 तलाठ्याची नियुक्ती होणार असून त्यामध्ये ओबीसी प्रवर्गातील 13 महिला आहेत दि.5 फेब्रु 2024 पर्यंत त्यांच्या प्रमाणपत्राची पडताळणी झाल्यावर नियुक्ती होणार असल्याचे समजते.मर्जीनाचे चुलते श्री. जहांगीर इनामदार हे दिल्ली येथे केंद्र शासनामध्ये उच्च पदावर अधिकारी असून गावातील ते पहिले यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झालेले पहिले अधिकारी आहेत मर्जीना ही एम एस सी (केमिस्ट्री) पदवीधर असल्याने भावी आयुष्यात एमपीएससी परीक्षेत उज्वल यश मिळावे अशा शुभेच्छा श्री डी वाय कुलकर्णी यांनी दिल्या.मर्जीनाचे जवळे पंचक्रोशीमध्ये सर्वत्र कौतुक होत असून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.