सांगोला तालुक्यातील वाळू उत्खनन तात्काळ थांबवावे अन्यथा रस्त्यावर उतरणार-डॉ.बाबासाहेब देशमुख
निरा-उजवा कालवा कमलापूर गावातील फाटा क्रमांक 5 चे पाणी उपफाटा क्र-8 ला तात्काळ देणे

सांगोला प्रतिनिधी-प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने कमलापूर गावातील सर्व ग्रामस्थांनी वाळू तस्करी रोखण्यासाठी तहसील कार्यालय सांगोला येथे धरणे आंदोलन सुरू केले. यामध्ये मोठ्या प्रमाणात कमलापूर गावातील व पंचक्रोशीतील सर्व नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गेल्या तीन साडेतीन वर्षांमध्ये माण नदीपात्रातील मोठ्या प्रमाणात वाळूचा उपसा केला जातो. त्यामुळे पर्यावरणाची व भूजल पातळीची मोठी हानी झाली आहे. अक्षरशः नदी पात्र कोरडे पडला आहे. यासंदर्भात कमलापूर गावातील युवक श्री एकनाथ शेंबडे यांनी उपोषण करण्याचा निर्णय घेतला.खरोखर सांगोला तालुक्यामध्ये लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांच्या संगनमताने दररोज मोठ्या प्रमाणात वाळू उपसा केला जातो. त्यासाठी विशिष्ट असा हप्ता ठरलेला आहे. तो हप्ता घेण्यासाठी बोगस एजंटाची नेमणूक केली आहे. बोगस एजंटच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात हप्ते वसुली चालू आहे. वाळू उत्खनन झाल्यामुळे पाण्याची पातळी खालावली आहे. गुन्हेगारी प्रवृत्ती वाढीस लागली आहे. व्यसनाधीनता वाढीस लागली आहे.
यासंदर्भात तहसील कार्यालय सांगोला येथील प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर या उपोषण स्थळाला भेट देण्यासाठी पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाचे अध्यक्ष डॉ.बाबासाहेब देशमुख, आमदार शहाजी बापू पाटील, युवा नेते अनिकेत देशमुख, यावेळी डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी सांगोला तालुक्याचे तहसीलदार संतोष कणसे यांना जाब विचारला. व सर्व वाळू बंद करण्यासाठी काही वेळ देण्याचे निश्चित झाले. सांगोला तालुक्यातील वाळू तीन आठवड्यामध्ये बंद करण्याचे तहसीलदार यांनी शब्द दिला. डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी सांगोला तालुक्यातील अवैधरित्या वाळू बंधन झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला. यावेळी आ.शहाजी बापू पाटील यांना समोरासमोर देशमुख बंधूंनी या संदर्भात चर्चा केली.
पाणी सोडण्याचे व संपूर्ण वाळू येत्या काळात बंद करण्याची आश्वासन दिले. यावेळी उपस्थित, परमेश्वर कोळेकर, उद्योजक विष्णू देशमुख, मारुती सरगर सर, अंकुश येडगे, निवृत्ती अनुसे, प्रा.एन.डी.बंडगर,उद्योजक रमेश अनुसे,रवी मेटकरी, बीरूदेव नरूटे,संतोष देवकते,अमोल खरात, हनमंत कोळवले सर, शिवसेना शहराध्यक्ष तुषार इंगळे, कमृद्धीन खतीब,कमलापूर गावचे श्री.मंगेश म्हमाणे सर,सरपंच मधुकर तंडे, उपसरपंच देविदास ढोले, माजी चेअरमन विजय अनुसे, सोमनाथ अण्णा अनुसे, राहुल ऐवळे, रामदास काळे, ग्रामपंचायत सदस्य, अंकुश गोडसे,गोरख पुजारी,रावसाहेब अनुसे, डॉ.सतीश तंडे, नितीन काळे, साधू गोडसे, नारायण बंडगर,दामोदर बंडगर, सत्यवान बंडगर, तानाजी पांढरे सर, तुकाराम गेजगे, स्वप्निल करडे, रोहित कोळेकर,सचिन ढोले सर,किसन गोरड ,बाबुराव तंडे,नवनाथ शेंबडे,ओंकार नवले,नितीन नवले,शांताराम गावडे, कृष्णा अनुसे, नवनाथ अनुसे,अशा अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या.
*चौकट*
सांगोला तालुक्यातील कमलापूर गावातील पाण्याचा जो प्रश्न निर्माण झाला आहे तो तात्काळ सोडवावा. व अधिकार्यावर त्वरित कारवाई करावी.तसेच अवैधरित्या वाळू उत्खनन करणारे गावगुंड यांचाही तात्काळ बंदोबस्त करावा.कार्यकर्त्याला धमकी देणे थांबवावे. कायदा हातात घेण्याचा कोणीही प्रयत्न करू नये. उपोषण कर्त्याला संरक्षण देणे.
*डॉ.अनिकेत देशमुख*
(युवा नेते शेकप)
*चौकट*
नीरा-उजवा कालवा फाटा क्रमांक 5 उपफाटा क्रमांक-8 अधिकाऱ्याच्या उद्धटपणामुळे, आणि भुलवा भुलवी मुळे, कमलापूर गावातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. या नुकसानाची तात्काळ भरपाई मिळावी. व दोषी अधिकाऱ्यावर कडक कारवाई करावी.
*बाबुराव ( बी.आर) बंडगर*
(संचालक-महाराष्ट्र औद्योगिक वसाहत)