सांगोला तालुकाशैक्षणिक

जवळे हायस्कूल ज्युनिअर कॉलेजमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.

जवळे(प्रशांत चव्हाण)कै. सौ.वत्सलादेवी देसाई विद्यालय व कै. अण्णासाहेब घुले-सरकार कनिष्ठ महाविद्यालय जवळे या प्रशालेत प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.आ.दीपक आबा साळुंखे पाटील यांच्या सूचनेनुसार कु.अलसबा बागवान हिच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर प्रशालेतील एनसीसीच्या कॅडेट्सनी शानदार संचलन करून अध्यक्षांना मानवंदना दिली.   जवळे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सन 2023 24 मध्ये महाराष्ट्र सरकारने आयोजित केलेल्या शालेय राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा14 वर्षे वयोगटातील कबड्डी प्रकारात तसेच 19 वर्षे वयोगटातील लांब उडी स्पर्धेत तसेच 19 वर्षे वयोगट मल्लखांब स्पर्धेत तसेच  किशोर किशोरी कबड्डी स्पर्धेतील उत्तुंग यश प्राप्त केलेल्या प्रशालेतील तसेच सन 2024 पुणे येथे होणाऱ्या 34 व्या किशोर किशोरी राज्यस्तरीय अजिंक्य कबड्डी स्पर्धेसाठी तसेच मा.मुख्यमंत्री चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूंचा व सन 2022 23 मध्ये झालेल्या विविध स्पर्धा परीक्षेतील शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचा मा.आ.दीपक आबा साळुंखे पाटील यांच्या शुभहस्ते बक्षिस देऊन सन्मान करण्यात आला.शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांना डॉ. सुदीप चव्हाण यांचेकडून सन्मान चिन्ह, रोख रक्कम, व पेन देण्यात आले. दरवर्षीप्रमाणे जवळे येथील शारदा फुटवेअरचे मालकश्री.भारत सुरवसे यांनी विद्यालयातील एकूण 35 गरजू विद्यार्थ्यांना मोफत चप्पल वाटप केले.तसेच प्रशालेतील माजी विद्यार्थ्यांचा स्पर्धा परीक्षा देऊन विविध शासकीय पदावर  नियुक्ती झाल्याबद्दल मा.आ.दीपक आबा साळुंखे-पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
मनोगत व्यक्त करताना मा.आ.दीपक आबा साळुंखे-पाटील म्हणाले भारतीय संविधानाने सर्व भारतीय नागरिकांना हक्क अधिकार, कर्तव्य जबाबदारी हे दिले आहे. तेव्हा सर्वांनी देश कार्यासाठी योगदान द्यावे.
सदरप्रसंगी सरपंच सौ.सुषमाताई घुले-सरकार,अरुण भाऊ घुले-सरकार, साहेबरावदादा पाटील,बाबासाहेब इमडे,शिवाजी घुले सर,दत्ता बर्वे,अनिल साळुंखे(चेअरमन),सलीम इनामदार साहिल इनामदार,मैनुद्दीन खलिफा,शहाजान आतार,ग्रा.पं सदस  विजयकुमार तारळकर,विठ्ठल गयाळी,निसार शेख,मीना सुतार लीलावती मेहेत्रे यांच्यासह जि.प.प्रा.मुलांची शाळा नंबर 1 मधील शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी तसेच ग्रामस्थ, तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्य बाळासाहेब शिंदे सर, उपमुख्याध्यापक संजय पोळ सर सर्व शिक्षक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार श्री.विजय लांडगे सर यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!