सांगोला येथे होणार भव्य महिला उद्योजकता मार्गदर्शन मेळावा : ॲड. सचिन देशमुख

कोळा : कोळा जिल्हा परिषद गटाचे लोकप्रिय माजी सदस्य ॲड. सचिन देशमुख यांच्या संकल्पनेतून कै. ॲड. अशोकराव देशमुख युवा व क्रीडा मंच कोळे यांच्या वतीने तालुक्यातील महिलांसाठी बुधवार दिनांक ३१ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता सदानंद मल्टीपर्पज हॉल मिरज रोड सांगोला येथे ग्रामीण महिला उद्योजकता मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन केले असल्याचे ॲड. सचिन देशमुख यांनी सांगितले.
सांगोला तालुक्यातील महिलांनी बचतीच्या माध्यमातून बचत गटाची उभारणी करून त्यामाध्यमातून नवीन उद्योग व्यवसाय चालू करावेत व त्यांनी नवीन संस्था उभ्या कराव्यात यासाठी त्यांना पुणे येथील नामवंत संस्था सेवा वर्धिनी आणि भारतीय स्त्री शक्तीचे मार्गदर्शन मिळावे याकरिता या महिला उद्योजकता मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन केले असून या मेळाव्याचे उद्घाटन जि.ग्रा.वि. यंत्रणा सोलापूरचे प्रकल्प संचालक सुधीर ठोंबरे यांच्या हस्ते होणार असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवावार्धिनी पुणे चे कार्यवाह सोमदत्त पटवर्धन हे राहणार आहेत. सेच प्रमुख वक्ते म्हणून परिवतर्न उद्योग सांगलीच्या संचालिका कल्याणीताई गाडगीळ तर प्रमुख पाहुणे म्हणून लेबर फेडरेशनचे चेअरमन बाबा करांडे, सांगोला पंचायत समितीचे माजी सभापती बाळासाहेब काटकर, जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन चवरे, मा.जि.प. सदस्य गजेंद्र कोळेकर, खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन विलासराव देशमुख, सांगोला पंचायत समितीचे माजी सभापती राणीताई कोळवले, सांगोला पंचायत समितीचे मा. उपसभापती संतोष देवकते, स्वावलंबी भारत अभियानाचे अरविंद दोरावत, सेवा वर्धिनी पुणे च्या उमा व्यास, भा.स्त्री. शक्ती राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्या ॲड. राजेश्वरी केदार, सामाजिक कार्यकर्त्या चित्राताई जांबळे, तालुका अभियान व्यवस्थापक कुणाल पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार असून या मेळाव्यामधून महिलांसाठी विविध उद्योगांची संधी, त्यासाठी आवश्यक ते प्रशिक्षण, मार्केटिंगची विविध तंत्रे, अर्थ सहाय्याच्या विविध योजना याबाबत तज्ञ मान्यवरांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्यामुळे या महिला उद्योजकता मेळाव्यास सांगोला तालुक्यातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन मा. जि.प. सदस्य ॲड. सचिन देशमुख यांनी केले आहे.