नाझरा विद्यामंदिर इंग्लिश मेडियम स्कूल मध्ये पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न

नाझरा(वार्ताहर):-नाझरा विद्यामंदिर इंग्लिश मेडियम स्कूल मध्ये आज पारितोषिक वितरणाचा कार्यक्रमाची सुरुवात कै. गुरुवर्य बापूसाहेब झपके व बाईसाहेब झपके यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले .
यावेळी श्री . शशिकांत पाटील (उपसरपंच नाझरा , ) सुमित्रा लोहार (सदस्य नाझरा) श्री नागेश बाबर (आर्मी,चोपडी), पाटील सर , नाझरा विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजचे मुख्याध्यापक श्री .अमोल गायकवाड सर,नाझरा विद्यामंदिर इंग्लिश मेडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका कु. मंगल पाटील मॅडम इत्यादी मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला. तसेच नर्सरी ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करून सतरा गोल्ड मेडल, दहा सिल्वर मेडल, ब्राँझ मेडल सहा , दोन रंग उत्सव अवॉर्ड प्राप्त केले. तसेच एस.ओ.एफ. मार्फत घेण्यात आलेल्या आय .जी.के.ओ व आय .इ. ओ परीक्षेमध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांना गोल्ड मेडल व सर्टिफिकेट देण्यात आले .श्री.अश्वजीत जाधव सर यांना मार्गदर्शक शिक्षक व कला भूषण अवॉर्ड देण्यात आला .
तसेच एस ओ एफ ची परीक्षा पार पाडण्यासाठी मार्गदर्शक शिक्षक सौ.सोनाली सरगर मॅडम,श्री. अमितकुमार मिसाळ सर ,कु.ऐश्वर्या रणपिसे मॅडम यांनी कठीण परिश्रम घेतले. यावेळी कार्यक्रमाचे आभार सौ.सोनाली सरगर मॅडम यांनी मांडले. तर सूत्रसंचालन कु.ऐश्वर्या रणपिसे मॅडम यांनी केले. तसेच कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी कु.अश्विनी माळी मॅडम, कु. शामल लोखंडे मॅडम, कु. काजल पाटील मॅडम, कु. आम्रपाली गडहिरे मॅडम सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.