ऋतुजा लटके यांचा दणदणीत विजय; सांगोला युवा सेना व संभाजी ब्रिगेडच्या वतीने विजयाचा आनंदोत्सव साजरा

अंधेरी पोटनिवडणुकीमध्ये शिवसेनेच्या ऋतुजा लटके यांनी दणदणीत विजय मिळवून मशालीची ज्योत पेटवली आहे.या विजयाचा आनंदोत्सव सांगोला युवासेना व संभाजी ब्रिगेडच्या वतीने संपर्कप्रमुख अनिल कोकीळ, युवा सेना राज्य विस्तारक उत्तमजी आयवळे यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराज चौक सांगोला येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना लाडू भरून साजरा करण्यात आला.
यावेळी युवा सेना उपजिल्हाप्रमुख रघुनाथ गायकवाड, युवा सेना शहर प्रमुख सौरभ चव्हाण, संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्ष प्रताप इंगवले, युवासेना शहर चिटणीस योगेश जुंदळे, शिवसेना उपशहर प्रमुख संदीप जगताप, युवा सेना उपतालुकाप्रमुख रनजीत रुपनर, रवी गंभीरे, गोपाल म्हेत्रे, अजय चव्हाण, सुरज चांदणे, राहुल बाबर, संतोष येडगे, योगेश खुळपे, आशुतोष रुपनर, सुमित माने, रोहन सुतार, इत्यादी युवासेना व संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.