आरोग्याची वारी, आबालवृद्धांच्या उत्साहात न्हाऊन निघाली पंढरी.. – चेअरमन अभिजीत पाटील.
(पंढरीनगरीत DVP पंढरपूर मॅरेथॉनचे याही वर्षी यशस्वी आयोजन)
पंढरपूर ( प्रतिनिधी):-यशस्वी आयोजनाची परंपरा कायम राखत अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात आणि अबालवृद्धांच्या उस्फुर्त प्रतिसादात DVP पंढरपूर मॅरेथॉन संपन्न झाली. हजारो नागरिकांनी स्वच्छ पंढरपूर, सुंदर पंढरपूर, सुदृढ पंढरपूर हे ब्रीद घेऊन या स्पर्धेत सहभाग नोंदवला.
अगदी ६ वर्षांपासून ते साठी पार केलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी यामध्ये उस्फुर्त सहभाग नोंदवला. अनेक प्रतिथयश मान्यवर देखील यामध्ये सहभागी झाले होते. धाराशिवचे खासदार श्री.ओम राजेनिंबाळकर यांनी देखील २१ किमीचा टप्पा धावत पूर्ण करून ‘फिटनेस‘चे एक प्रेरणादायी उदाहरण प्रस्तुत केले.
खा.ओमराजे निंबाळकर, श्री विठ्ठल सह.साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील, डॉ. प्रशांत निकम, प्रांताधिकारी गजानन गुरव, विश्वंभर पाटील, डाॅ.बायगुडे, किरण घाडगे यासह अनेक मान्यवर उपस्थित होते…
10 किलोमीटर गट ( ओपन गट):- अजित लवटे (32 मिनिट 2 सेकंद ),अमोल नागणे (32 मिनिट 53 सेकंद), निशांत सावंत( 33 मिनिट 25 सेकंद)
महिला गट-आर्या काळेल ( 38मिनिट 38 सेकंद), वैष्णवी सावंत (38 मिनिट 51 सेकंद),योगिनी साळुंखे (39 मिनिट 37 सेकंद )
21 किलोमीटर ओपन पुरुष – अंकुश हाके (2 तास 8 मिनिट 50 सेकंद ), विशाल कांबीरे (1 तास 9 मिनिट 25 सेकंद )
महिला गट:- साक्षी जेडाल (1 तास 20 मिनिट 6 सेकंद), अर्चना जाधव ( 1 तास 23 मिनिट 8 सेकंद), आकांक्षा शेलार ( 1 तास 24 मिनिट 8 सेकंद )
सहभागी स्पर्धकांना अल्पोपाहार, टी शर्ट, मेडल आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. हा उपक्रम यशस्वी होण्यासाठीइंजिनियर भारत बलभीम ढोबळे, सचिव बालाजी गणपत शिंदे, खजिनदार विश्वंभर गणपतराव पाटील, उपाध्यक्ष डॉ. मंदार सुभाष सोनावणे , सहसचिव रेखा सतीश चंद्रराव , सहखजिनदार महेश शरदराव भोसले ,सदस्य डॉ.संजयकुमार ज्ञानदेव सरडे, डॉ. आशिष गोपालकृष्ण शहापूरे ,डॉ.चंद्रकांत बाळास मगर, डॉ.संगिता शीतल पाटील, किरण शंकर घाडगे, भगवंत अनंतराव बहिरट, दिलीप पांडुरंग कोरके, गणेश औदुंबर बागल ,राजन बळीराम थोरात , जयलक्ष्मी संतोष माने ,माधुरी सुरेश माने यासह रनर्स असोसिएशनच्या सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.