*गुरुनिर्वाण रुद्र पशुपती कोळेकर महास्वामीजी कोळा अभिष्टचिंतन सोहळा निमित्त वधू वर पालक मेळावा संपन्न*

गुरुनिर्वाण रुद्र पशुपती कोळेकर महास्वामीजी कोळा अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त कोळा तालुका सांगोला येथे महात्मा बसवेश्वर संस्थेतर्फे कोळेकर महाराज मठ येथे लिंगायत समाजातील युवक युवतींचा वधू वर मेळावा संपन्न झाला यामध्ये 250 मुले व 120 मुलींनी सहभाग घेतला.
सदर मेळाव्याचे उद्घाटन गुरुवर्य मासोळीकर महाराज व गुरुवर्य महादेव महाराज यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले यावेळी डॉक्टर रवींद्र आरळी, भक्तराज ठिगळे, अरुणाताई माळी, शंतनू सगरे, भारत जवळे, उत्तरेश्वर भूटे, नारायण माळी, श्रीकांत आरळी, मनोज उकळे, आनंद घोंगडे, उज्वला माळी, महेश बोरकुले, महेश भिंगे, सचिन देशमुख, दिलीप देशमुख, भारत इमडे, डॉक्टर सादिक पटेल इत्यादी मान्यवर उपस्थित होते. यावेळी गुरुनिर्वाण रुद्र पशुपती कोळेकर महास्वामीजी यांचे महान कार्याबद्दल माहिती देण्यात आली. व महात्मा बसवेश्वर बहु संस्थेने वधू-वर मेळाव्याचे आयोजन चांगल्या प्रकारे केल्याचे सांगितले. यावेळी वधू वर यांनी आपला परिचय करून दिला.
सदर प्रसंगी गोपाळ माळी, रवींद्र पाटणे, व प्रभुलिंग अशोक तोडकर यांनी अन्नदान केले. या मेळाव्यात फलटण, पुणे, नांदेड, इचलकरंजी, कोल्हापूर, सोलापूर, लातूर, सांगली येथील वधू-वरांनी सहभाग नोंदविला. प्रास्ताविक सचिन देशमुख यांनी केले तर आभार प्रदर्शन नारायण माळी सर यांनी मानले*