सांगोला तालुकामहाराष्ट्र

श्री.श्री.श्री. 108 गुरुमुर्ती निर्वाण रुद्रपशुपती कोळेकर महास्वामीजी यांच्या प्रकट दिनानिमित्त जवळे अंगणवाडीमध्ये शालेय साहित्य व चॉकलेट वाटप.

जवळे(प्रशांत चव्हाण)श्री.श्री.श्री.108 गुरुमुर्ती निर्वाण रुद्रपशुपती कोळेकर महास्वामीजी यांच्या प्रकट दिनानिमित्त जवळे येथील अंगणवाडी मधील चिमुकल्यांना शालेय साहित्य व चॉकलेट वाटप करण्यात आले. यावेळी अंगणवाडी मधील सर्व चिमुकल्यांनी अगदी उत्साहाने महाराजांचा प्रसाद म्हणून आनंदाने स्वीकार केला. तसेच अंगणवाडी महिला कर्मचारी यांनी मनःपूर्वक अभिनंदन व्यक्त केले व महाराजांना प्रकट दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
सदरप्रसंगी श्री.निरंजन स्वामी,श्री.निलेश स्वामी(सर) श्री.रवींद्र स्वामी,श्री.विठ्ठल गयाळी(ग्रा.पं स)श्री.बसवेश्वर स्वामी श्री. शशिकांत रायचुरे आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!