सांगोला तालुका

सांगोला विद्यामंदिर वार्षिक स्नेहसंमेलन  पारितोषिक वितरण समारंभ संपन्न; स्पर्धा परीक्षेतील यश म्हणजे मनापासून केलेल्या तयारीचा विजय – सुहेल काझी (IRS)  

सांगोला (प्रतिनिधी):भविष्यात अधिकारी होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांनी महत्त्वाकांक्षा,जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वास अंगी बाळगावा. ध्येयनिश्चिती करून यश मिळविण्यासाठी मनाची गुंतवणूक, बांधिलकी व  शिक्षकांचे मार्गदर्शन घेतले व मनापासून तयारी केली तर धवल यश मिळेल असे प्रतिपादन सुहेल काझी‌ (अप्पर आयुक्त (भा.रा.से.) जी.एस.टी.संचलनालय पुणे ) यांनी  केले.सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या पारितोषिक वितरण समारंभ कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.यावेळी व्यासपीठावर सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रा.प्रबुध्दचंद्र झपके, संस्था सचिव म.शं. घोंगडे, खजिनदार शंकरराव सावंत, सदस्य दिगंबर जगताप, काझी परिवार, सर्वोत्तम व एनसीसी कॅडेट विद्यार्थी पालक,प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कै. गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या प्रतिमेस प्रमुख पाहुणे मा.सुहेल काझी यांच्या हस्ते पुष्पहार समर्पित करण्यात आला.प्रमुख पाहुण्यांचा परिचय ज्युनिअर कॉलेज  स्नेहसंमेलन संमेलन प्रमुख प्रा.धनाजी चव्हाण यांनी करून दिला.संस्थाध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांच्या हस्ते प्रमुख पाहुणे मा.सुहेल काझी यांचा शाल,पुष्पगुच्छ व ‘सांगोल्याचे बापूजी’ ग्रंथ देऊन तर संस्थाध्यक्ष प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांचा प्राचार्य भीमाशंकर पैलवान यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मधील अहवालाचे वाचन उपमुख्याध्यापक लक्ष्मण जागंळे यांनी केले.चालू शैक्षणिक वर्षातील सर्वोत्तम विद्यार्थी निवड प्रक्रियेविषयीचे निवेदन उन्मेश आटपाडीकर यांनी केले.प्रशालेची सर्वोत्तम विद्यार्थी म्हणून कुमारी जवंजाळ सोनम मकरंद (इ.१० वी ब) तर ज्युनिअर कॉलेजमधून कुमारी दिक्षीत सायली दत्तात्रय ( इ.१२ वी संयुक्त वाणिज्य) यांची निवड झाल्याबद्दल पालकांसमवेत प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कै.गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या अमोघ कार्यांविषयी प्रा.धनाजी चव्हाण यांनी आंतरराष्ट्रीय परिषदेत शोध निबंध सादर केल्याबद्दल,दिल्ली येथे संपन्न झालेल्या ऑल इंडिया थलसेना एन.सी.सी कॅडेट समृद्धी नागनाथ भातुंगडे,अभिषेक रमेश कोरे ,यश संतोष सोनलकर यांचा व मार्गदर्शक शिक्षक ए.एम.ओ.मकरंद अंकलगी तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या युवा महोत्सवात माजी विद्यार्थिनी कु.तृप्ती बेंगलोरकर हिला ‘गोल्डन गर्ल’ म्हणून गौरविण्यात आल्याबद्दल या सर्वांचा सत्कार प्रमुख पाहुणे मा.सुहेल काझी यांच्या हस्ते करण्यात आला.
पुढे बोलताना मा.काझी म्हणाले शिक्षणाशिवाय देशाचा विकास शक्य नाही.विद्यार्थ्यांनी भविष्यातील चांगली स्वप्ने पाहावीत,स्वप्ने सत्यात उतरवण्यासाठी मनापासून प्रयत्न करावेत.अधिकारी होण्याचा मानस अंगी बाळगल्यास तो प्रवास पूर्ण करावा.स्पर्धा परीक्षेची  तयारी करताना वेळेचे विचार करू नये.आवडीचे क्षेत्र निवडल्यास स्पर्धा परीक्षेत शंभर टक्के यश मिळेल. विद्यार्थ्यांनी सूक्ष्म नोंदी करून प्रत्येक दिवसाचा आनंद घ्यावा.सोशल मिडिआचा कमी वापर करून वर्तमानपत्राचे अधिक वाचन करावे.
यावेळी प्रशाला व ज्युनिअर कॉलेज मधील पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बक्षिसांचे व प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.याचे निवेदन वैभव कोठावळे,चैतन्य कांबळे व प्रा.प्रसाद खडतरे यांनी केले.
सदर पारितोषिक वितरण समारंभासाठी सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ कार्यकारिणी सदस्या शीलाकाकी झपके,माजी प्राचार्य, सेवानिवृत्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, संस्था प्रेमी नागरिक,  मित्र परिवार, प्रशाला व ज्युनिअर कॉलेजचे पर्यवेक्षक अजय बारबोले, पोपट केदार, बिभिषण माने, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य भीमाशंकर पैलवान, सूत्रसंचालन उन्मेश आटपाडीकर  यांनी केले तर उपप्राचार्य गंगाधर घोंगडे यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशाला व ज्युनिअर कॉलेज मधील सर्व प्रशासन, उत्सव विभाग, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले.

सांगोला तालुक्यामध्ये माध्यमिक शिक्षणाची सर्वप्रथम सोय उपलब्ध करून देण्यात गुरुवर्य बापूसाहेब झपके यांचे योगदान खूप मोठे असून बापूसाहेबांनी सुरू केलेले सांगोला विद्यामंदिर गुणवत्तेच्या बाबतीत अग्रेसर होते.ते कायम ठेवण्यासाठी कै. बाईसाहेब झपके, विद्यमान अध्यक्ष झपके सर व झपके कुटुंबिय यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे असे सांगत मी या शाळेचा  विद्यार्थी आज याच शाळेत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असल्याचा मला अभिमान आहे असे सुहेल काझी यांनी सांगितले व  त्यावेळचे शिक्षक प्राचार्य भीमाशंकर पैलवान सर  यांच्या  अध्यापनाविषयी गौरव करत.अध्यापन करणाऱ्या उपस्थित सर्व  शिक्षकांच्या कार्याचा उल्लेख केला.व प्रत्यक्ष वर्गात जाऊन बसण्याचाही आनंद घेतला .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!