राजकीयमहाराष्ट्र

सोलापूर जिल्ह्यात मतदानाच्या दिवशी सर्व आठवडेबाजार राहणार बंद

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी जिल्ह्यातील 42 (अ.जा.), सोलापूर व 43 माढा लोकसभा मतदार संघाचे मतदान मंगळवार दि.7 मे 2024 रोजी होणार आहे. महाराष्ट्र पोलीस अधिनियम, कलम 37 (3) अन्वये सार्वत्रिक लोकसभा निवडणूक- 2024 च्या अनुषंगाने मतदान केंद्राच्या परिसरात जिल्ह्यातील (पोलीस आयुक्तालय हद्द वगळून) सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यासाठी मतदाना दिवशी जिल्ह्यातील सर्व बाजार बंद ठेवण्याचे आदेश  जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी  निर्गमित केले आहेत.
 बार्शी तालुक्यात  आळगाव ,भातंबरे ,नारी, घारी, अक्क्लकोट तालुक्यात हैद्रा ,किणी ,दुधनी, दक्षिण सोलाापूर तालुक्यात इंगळगी, वळसंग, तिल्लेहाळ  मंद्रुप येथील कूसूर, तेलगाव ,माळकवठे, माढा तालुक्यात  माढा , वरवडे , भिमानगर, बेंबळे, करमाळा तालुक्यात वरकुटे ,हिवरे, घोटी, सालसे, रोपळे क, मोहोळ तालुक्यात कुरूल , सावळेश्वर, औंढी ,येवती, मंगळवेढा तालुक्यात हुलजंती , गोणेवाडी ,लेंडवे चिंचाळे, सांगोला तालुक्यात पाचेगाव बुद्रुक, सोनंद, उदनवाडी, वाकी शिवणे, महिम, कटफळ, बलवडी तर माळशिरस  तालुक्यात  पिलीव, इस्लामपूर या गावात मंगळवार दि.7 मे 2024 रोजी  आठवडी बाजार भरविण्यास मनाई करण्यात करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!